जाहिरात

हॉटेल पॉलिटिक्सचा जोर; भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुंबईतील कोणत्या 5 स्टारमध्ये मुक्काम?

विधानपरिषद निवडणुकीच्या अगोदर उद्या आयटीसी ग्रँडमध्ये ठाकरे गटातील आमदारांच्या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

हॉटेल पॉलिटिक्सचा जोर;  भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुंबईतील कोणत्या 5 स्टारमध्ये मुक्काम?
मुंबई:

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल पॉलिटिक्सचा जोर वाढला आहे. निवडणुकीत आमदारांची फुटाफूट टाळण्यासाठी भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुक्काम हॉटेलवर असणार आहे. आमदारांना मुंबईतल्या हॉटेल्सवर ठेवण्यात येणार आहे. आमदारांची फुटाफूट टाळण्यासाठी भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंटवर असणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांना वांद्र्यातील ताज लँड्स ऍण्ड हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

यासाठी हॉटेल्समध्ये 60 रुम बूक करण्यात आल्याचं कळतंय. तर तिसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या अगोदर उद्या आयटीसी ग्रँडमध्ये ठाकरे  गटातील आमदारांच्या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई पदवीधर आमदार अनिल परब निवडून आल्याने हे स्नेहभोजन अनिल परब यांनी आयोजित केल्याची माहिती मिळतेय. याशिवाय 12 तारखेला विधान परिषदेची निवडणूक असल्याने ठाकरे गटाचे आमदार ITC मध्ये उद्यापासून 12 जुलैपर्यत राहणार असल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पुढचे 3 दिवस आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला असणार आहेत.

नक्की वाचा - खासदार सत्कारात मग्न, नागरिकांची पाण्यासाठी वणवण, बीडमध्ये काय चाललंय?

12 जुलैला विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मविआचे तीन उमेदवार मैदानात आहेत. निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी  यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी  महाविकास आघाडीने तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली गेली आहे. तीन ही जागा कशा जिंकता येतील यावर चर्चा करण्यात आली. शिवाय आपल्याकडे पुरेस संख्याबळ असल्याचा दावाही यानिमित्ताने मविआने केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com