अर्जुन गोडगे, धाराशिव
पाण्याच्या वादातून तिघांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील बावी येथे ही घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. भावकीतील सामायिक विहिरीत पाणी भरण्यावरून दोन कुटुंबामध्ये हा वाद झाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या वेळी विहिरीतील शेतीच्या पाण्याच्या वादातून भावकीचे भांडण झाले होते. यानंतर दोन्ही कुटुंबात झालेली शाब्दिक बाचाबाची हाणामारीपर्यंत विकोपाला गेली. या मारहाणीत बाप-लेक आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. आप्पा काळे आणि परमेश्वर काळे अशी मृत बाप-लेकांची नावे असून सुनील काळे असं मृत पुतण्याचं नाव आहे.
(नक्की वाचा- Suresh Dhas: मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक, 3 कोटींची मागणी, 2 कोटींवर डिल, धसांनी सर्वच काढलं)
शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कुणाची या शुल्लक कारणावरून हा वाद सुरु झाला होता. शब्दाला शब्द लागत गेला आणि वाद वाढत गेला. वाद विकोपाला गेला आणि याता भावकीतील तिघांचा मृत्यू झाला. पोलीसांना गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ताब्यात घातलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
(नक्की वाचा- Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)