Wardha Accident: वर्ध्यात कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; 2 फोटोग्राफर्ससह तिघांचा मृत्यू

Wardha Accident News: विशांत वैद्य आणि गौरव गावंडे हे दोघे फोटोग्राफर एका ऑर्डरचे काम आटोपून आपल्या सहकाऱ्यासोबत कारने परतत असताना हा अपघात झाला.

जाहिरात
Read Time: 1 min

निलेश बंगाले, वर्धा

वर्धा जिल्ह्यातील धोत्रा फाट्याजवळ काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भयानक रस्ते अपघातात तीन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. एका कंटेनर आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन फोटोग्राफर्सचा जागीच मृत्यू झाला, तर एका सहकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातातील मृतांची नावे

विशांत वैद्य, गौरव गावंडे, वैभव शिवणकर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. विशांत वैद्य आणि गौरव गावंडे हे दोघे फोटोग्राफर एका ऑर्डरचे काम आटोपून आपल्या सहकाऱ्यासोबत कारने परतत असताना हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यांच्या कारचा चक्काचूर झाला. तसेच कॅमेरे आणि इतर साहित्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

(नक्की वाचा-  UP News: बाईकवरून जाणाऱ्या समोर पोलिसांनी हात जोडले; बाईकवर एवढेजण पाहून पोलिसाही थबकले)

एकाच वेळी दोन युवा आणि होतकरू फोटोग्राफर्सच्या अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. विशांत वैद्य आणि गौरव गावंडे हे दोघेही त्यांच्या कामामुळे जिल्ह्यात परिचित होते. या दुःखद घटनेबद्दल श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकारांनी एक दिवसा काम बंद ठेऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Topics mentioned in this article