दिव्यांग असूनही प्रमाणपत्र नाही, बीडच्या इंजिनिअर तरूणावर चहा विकण्याची वेळ

'तो' इंजिनिअर, एक डोळा निकामी, तरही दिव्यांग प्रमाणपत्र नाही, चहाच्या टपरीवर काम करण्याची वेळ.

Advertisement
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील 

एकीकडे वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण दिव्यांगांच्या प्रमाणपत्रामुळे गाजत आहे. तर दुसरीकडे मात्र दिव्यांग असतानाही बीडच्या एका युवकाला दिव्यांगाच्या प्रमाणपत्रापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. हा तरूण इंजिनिअर आहे. मात्र  दिव्यांगाचे प्रमाणपत्र त्याच्याकडे नसल्याने त्याला इंजिनिअर असूनही चहाच्या टपरीवर काम करण्याची वेळ आली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बीडच्या परळीतील वीरभद्र गड्डे हा तरूण राहतो. तो पाच वर्षाचा असताना त्याच्या उजव्या डोळ्याला काटा लागला होता. यामुळे त्याचा उजवा डोळा पूर्ण निकामी झाला. मात्र आई-वडिलांनी त्यावर उपचार करून कमीत कमी तो डोळा तरी वाचावा यासाठी प्रयत्न केले. डोळा राहिला मात्र उजव्या डोळ्याची दृष्टी कायमची गेली.

ट्रेंडिंग बातमी - नाशिक ते मक्का, 11 महिने, 8 हजार किलोमिटरचा पायी प्रवास करणारा अवलिया

यानंतर वीरभद्र ने आपल्या डाव्या डोळ्याच्या आधारेच आपले इंजिनिअरींगचे  शिक्षण पूर्ण केले.दरम्यान त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला दिव्यांगाचे प्रमाणपत्र भेटावे याकरता भरपूर प्रयत्न केले.अंबाजोगाई,बीड रुग्णालयात खेटेही मारले. मात्र उजवा डोळा पूर्ण निकामी होऊनही लेस डिसाबिलिटी असा शेरा देत त्याचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र नाकारण्यात आले.

ट्रेंडिंग बातमी - घरात शिरला, चोरी केली; नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा

वीरभद्रकडे अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी आहे. पण त्याला नोकरी नाही. दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याने त्याला नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे वीरभद्रला आपल्या वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करावे लागत आहे. तो त्यांना याच टपरीवर मदत करतो. त्यावरच आता त्याची उपजीविका आहे.एकीकडे वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र बाबत संशयाचे ढग असताना दुसरीकडे राज्यात आणखी किती वीरभद्र परिस्थितीशी झुंज देत आहेत हे बघितले पाहिजे.

Advertisement


 

Topics mentioned in this article