Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ; वाहनांनुसार किती टोल भरावा लागणार?

Samruddhi Highway : डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गावरील टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रति किलो मीटर 1.73 रुपये टोल आकारला जात होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Smaruddhi Mahamarg : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणे 1 एप्रिलपासून महागणार आहे. समृद्धी महामार्गावरील टोल दरात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धीवरील टोलमध्ये 19 टक्क्यांची वाढ केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

येत्या 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2028 पर्यंत ही टोल वाढ लागू असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या कंपनीने ही माहिती दिली आहे.

नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. येत्या महिनाभरात इगतपुरी ते उर्वरित 76 किमीचा मार्ग देखील सेवेत दाखल होणार आहे. 

(नक्की वाचा-  पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)

संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एमएसआरडीसीने त्यांच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गावरील टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रति किलो मीटर 1.73 रुपये टोल आकारला जात होता. मात्र या टोलमध्ये 1 एप्रिलपासून यात दरवाढ होणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा- रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लागणार; नियमबाह्य भाडे आकारणाऱ्यांची WhatsApp वर करता येणार तक्रार)

नागपूर ते इगतपुरी किती टोल द्यावा लागणार?

  • कार, हलकी वाहने - सध्याचे दर 1080 रुपये, नवीन दर 1290 रुपये
  • हलकी, व्यवसायिक, मिनीबस - सध्याचे दर 1745 रुपये, नवीन दर 2075 रुपये 
  • बस अथवा दोन एक्सेल ट्रक- सध्याचे दर 3655 रुपये, नवीन दर 4355 रुपये
  • तीन एक्सेल व्यवसायिक - सध्याचे दर 3990 रुपये, नवीन दर 4750 रुपये
  • अवजड बांधकाम यंत्रसामुग्री -  सध्याचे 5740 रुपये, नवीन दर 6830 रुपये
  • अति अवजड वाहने - सध्याचे दर 6980 रुपये, नवीन दर 8315 रुपये