आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावर देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या एका नामवंत वकिलाला एका तरुणीने ब्लॅकमेल करत लुबाडले आहे. या वकिलाने या संदर्भातील तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. हा वकील विवाहीत असून त्याला एक मूलही आहे. सदर प्रकार मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरूणीसह तिच्या घरच्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. या हाय प्रोफाईल प्रकरणामुळे उच्चभ्रू वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
नक्की वाचा: दिलीप खेडकरांशी मी बोलत नाही! पोलिसांवर कुत्रे सोडल्याच्या आरोपावर पूजा खेडकरच्या आई मनोरमा काय म्हणाल्या ?
सोशल मीडियावरून सुरू झाला संवाद
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित वकिलाची ओळख मे 2024 मध्ये या महिलेशी झाली होती. पहिल्या भेटीत या दोघांनी एकमेकांची सोशल मीडिया हँडलची माहिती घेतली आणि त्यावरून दोघांमध्ये संवाद सुरू झाला. वकिलाला एक मूल आहे आणि ते विवाहित आहेत. सोशल मीडियावरील ओळखीचे रुपांतर शारीरिक जवळिकीमध्ये रुपांतरीत झाले. या तरुणीने वकिलासोबत परदेशात जाऊनही मजा मारली होती अशी तक्रार करण्यात आली आहे.
विविध कारणांसाठी मागितले पैसे
हा वकील एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी जिनिव्हा इथे गेला होता. यावेळी तरूणीने त्याच्याशी संपर्क साधला आणि पैशांची गरज असल्याचे सांगितले. आपले नातेवाईक आजारी असून त्यांच्यावर उपचारासाठी या महिलेने नातेवाईक आजारी असल्याचे कारण देत 2.5 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर, मॉडेलिंग करिअरच्या नावाखाली तिने आणखी 2.5 लाख रुपये घेतले. यानंतर ही महिला विविध कारणे आपल्याकडून पैसे उकळत राहिली असं वकिलाने म्हटले आहे.
पैसे परत मागताच ब्लॅकमेलिंग सुरू झाले
बऱ्याच वेळा पैसे घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे वकिलाच्या लक्षात आले. त्याने या महिलेकडे पैसे परत मागितले यावर त्या महिलेने नकार दिला. आता प्रकरण आपल्या अंगाशी येत चाललंय हे कळाल्यानंतर या महिलेने वकिलाला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. वकिलाचे प्रायव्हेट फोटो वापरून तिने वकिलाला बदनाम करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली, यात तिच्या घरच्यांनीही तिला मदत केली असा आरोप वकिलाने केला आहे. या महिलेच्या घरची मंडळी आपल्याला फोन करायची आणि आपले फोटो सार्वजनिक करण्याची आणि बलात्काराच्या गुन्ह्यात (Fake Rape Case) अडकवण्याची धमकी देऊ लागले असा आरोप वकिलाने केला आहे. यामुळे घाबरून आपण 1.5 कोटी रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटलंय.
हा त्रास वाढू लागल्याने वकिलाने पोलिसांत धाव घेण्याचा निर्णय घेतला. त्याने गोरेगाव पोलिसांशी संपर्क साधला आणि सविस्तर तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी महिलेसह तिच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात खंडणी (Extortion) आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.