
वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ट्रक क्लीनर प्रल्हाद कुमार याच्या कथित अपहरण प्रकरणात त्यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. खेडकर कुटुंब हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे वादात असते. यावेळीस निर्माण झालेल्या वादादरम्यान पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांनंतर कानावर हात ठेवले आहेत. NDTV मराठीने त्यांना गाठून त्यांच्यावरील आरोपांबद्दल विचारले. यावेळी त्यांनी आपले आणि दिलीप खेडकरांचे बोलणे होत नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना बंदुकीचा धाखवणे, पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचा आरोप याबद्दलही त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
आमचा घटस्फोट झालाय!
मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणातील अन्य आरोपी असलेले दिलीप खेडकर यांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. त्यांनीही अंतरीम जामिनासाठी अर्ज केला आहे. ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणानंतर तुम्ही का पळालात ? असा प्रश्न विचारला असता मनोरमा खेडकर यांनी मी कुठेही पळून गेलेले नव्हते असा दावा केला आहे. दिलील खेडकरांबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की मी माझ्याबद्दलची माहिती सांगू शकेन मी दिलीप खेडकर यांच्याबद्दलची माहिती सांगू शकणार नाही कारण माझा आणि त्यांचा संपर्क नाही. दिलीप खेडकर यांच्याशी आपला घटस्फोट झाला असून आपले बोलणे होत नसल्याचे मनोरमा खेडकर यांनी सांगितले. त्यांच्यावरील आरोपांबद्दल मला माहिती नाही मात्र माझ्यावरील आरोप हे सगळे खोटे असल्याचे मनोरमा खेडकर यांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा: अल्पवयीन मुलीची विक्री करून जबरदस्तीने लग्न, नवऱ्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल
सगळे आरोप खोटे
मनोरमा खेडकर यांनी NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत ट्रक क्लीनरच्या अहरण प्रकरणी म्हटले की, "आम्ही काही पळालो नाही, मी माझ्या कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते." तपास करणाऱ्या रबाळे पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याच्या आरोपाबद्दल विचारले असता मनोरमा यांनी म्हटले की , 'तुम्ही पाहिलं का? मी त्यांच्यावर कुत्रे का सोडेन.' मनोरमा खेडकर यापूर्वी शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या की, तो माझ्या शेतातला आहे आणि माझ्या प्रोटेक्शनसाठी मी ती बंदूक काढली होती.
मनोरमा खेडकर यांची मुलाखत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world