Washim News : वीज बिल भरण्यासाठी आणली 7 हजारांची चिल्लर, थंडीतही महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना फुटला घाम

40 किलोची नाणी मोजण्यासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल पाच तास लागले.

जाहिरात
Read Time: 1 min

वाशिमच्या रिसोड शहरात महावितरण वीज बिल वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत असून यात काही ग्राहक ऑनलाइन तर काही रोख स्वरूपात बिल भरत आहेत. मात्र, एका व्यापाऱ्याने चक्क 7 हजार 160 रुपयांची चिल्लर नाणी महावितरणाच्या कार्यालयात जमा केली आहेत.

नक्की वाचा - Tigers Death : दहा दिवसांत पाच वाघांचे मृत्यू तर दोन वाघ बेपत्ता, संशयास्पद मृत्यूमुळे वनविभाग अलर्टवर

या नाण्यांमध्ये 1 आणि 2 रुपयांच्या नाण्यांचा समावेश असून चिल्लर नाणी महावितरण कार्यालयात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. सुमारे 40 किलो वजनाची ही नाणी तीन कर्मचाऱ्यांनी मिळून मोजण्याचं काम सुरू केलं. सर्व नाणी मोजण्यासाठी तब्बल पाच तास लागले. रोखपाल लाईनमन आणि कंत्राटी कामगार यांनी थंडीतही घाम गाळत ही नाणी मोजली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकले नाही. ही कायदेशीर चलन आहेत. मात्र या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.

Topics mentioned in this article