Dhule News: माजी आमदाराच्या बेशिस्त मुलाची पोलीस अधिकाऱ्याने चांगलीच जिरवली; पाहा VIDEO

धुळे वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. कारवाई दरम्यान स्वतः पोलीस अधिकारी सागर देशमुख उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dhule News : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी आमदारच्या मुलाची मस्ती पोलीस अधिकाऱ्याने रस्तावरच जिरवल्याची घटना धुळ्यात समोर आली आहे. धुळे वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ माजी आमदार फारुक शहा यांच्या मुलाची दुचाकी देखील पोलिसांना अडवली. 

फन्सी नंबर प्लेट लावल्याने पोलिसांना फारुख शाह यांच्या मुलाला अडवले. फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे दंड भरण्यात पोलिसांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या कारवाईचा राग आल्यामुळे माजी आमदाराच्या मुलाने पोलिसांसोबत हुज्जत घातली. 

(नक्की वाचा- Pune News: पुण्यात मुंबईप्रमाणे लोकलसेवा सुरू होणार? विधानसभेत सरकारचं उत्तर काय?)

यावेळी पोलीस अधिकारी सागर देशमुख यांचाही पार चढला आणि त्यांनी आमदाराच्या मुलाला ताब्यात घेण्यात सांगितले. तसेच फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे दंड भरावाच लागेल, कोणीही असो कायदा सर्वांना सारखा आहे, असे ठणकावून सांगत त्याच दंड भरण्यास सांगितले. काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. 

(नक्की वाचा-  Pune News : अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान झाडाझडती, एकाकडे सापडली पिस्तुल आणि काडतुसे)

धुळे वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. कारवाई दरम्यान स्वतः पोलीस अधिकारी सागर देशमुख उपस्थित होते. बुलेटवर मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे. सायलेन्सर काढून दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय विनाहेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपल सीट असं वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी सांगितलं.  

Advertisement
Topics mentioned in this article