Accident News: पुणे- सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली, 30 प्रवासी गंभीर जखमी, चालकाला डुलकी लागल्याने..

Solapur Pune Highway Accident: महामार्गावरील टेंभुर्णीजवळ गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यांमुळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात उलटली.

जाहिरात
Read Time: 2 mins

 संकेत कुलकर्णी, पंढरपूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेली अपघातांची मालिका अद्याप सुरुच आहे. आज सोलापूर पुणे महामार्गावर प्रवासी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.चालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर पुणे महामार्गावर टेंभुर्णी जवळ आढेगाव शिवारात प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स सदर  शिरपूर लातूर येथून पुण्याकडे निघाले होते. महामार्गावरील टेंभुर्णीजवळ गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यांमुळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात उलटली.

दरम्यान, या अपघातात पुणे आणि मराठवाड्यातील 30 प्रवासी जखमी झाले असून वीस जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. 

Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video

दुसरीकडे जळगावमध्येही एक मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या पाल जवळ बोर घाटामध्ये मजुरांना घेऊन जाणारी पिक अप व्हॅन उलटून अपघात झाला असून या अपघातात 1 मजूर जागीच ठार झाला आहे तर 21 मजूर जखमी झाले आहे. अनिल बारेला असे अपघातात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.  मध्यप्रदेशातील मालगाव कोठा येथून रावेर तालुक्यातील खिरोदा येथे शेती कामासाठी हे मजूर आले होते शेतीचे कामे आटोपून गावी परतत असताना बोर घाटात हा अपघात झाला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी! ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, पावसाळी अधिवेशनात देणार दणका