Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड; समिती अन् प्रशासनात विसंगती

हे शिल्प आता केवळ शिल्प न राहता वादाचा केंद्रबिंदू बनत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

तुळजापूर (Tuljabhavani Devi) येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फुटी भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे. मात्र हे शिल्प आता केवळ शिल्प न राहता वादाचा केंद्रबिंदू बनत आहे. तुळजापूरमध्ये साकारल्या जाणाऱ्या या शिल्पाच्या प्रतिकृतीवरून आधीच अष्टभुजा की द्विभुजा असा वाद पेटला होता. त्यात आता समितीने मागवलेल्या अहवालावरूनच विरोधाभास निर्माण झाला आहे.

तज्ज्ञांचा अहवाल दिला की नाही, यावरच समिती आणि प्रशासन एकमेकांशी विसंगत वक्तव्य करत असल्याने हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हे शिल्प कसे असावे याबाबतचा अहवाल तज्ज्ञांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हा दावा फेटाळून अहवाल मिळालाच नसल्याचे सांगितले आहे. 

नक्की वाचा - Chandrapur News: 1 गाव 2 ग्रामपंचायती, 2 शाळा, 2 निवडणूका, महाराष्ट्रात येण्याचा 'त्यांचा' मार्ग मोकळा होणार

यावरून  खोटं कोण बोलतंय? मंदिर समितीचे विश्वस्त की खुद्द प्रशासन? या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीनेच काही माहिती लपवली का ? मंदिर समितीच्या अध्यक्षांवर कोणाचा दबाव आहे का? हा गंभीर सवाल आता उपस्थित होतोय! आई भवानीच्या शिल्पासारख्या श्रद्धेच्या विषयावर लपवाछपवीचा खेळ सुरू असेल, तर तो भाविकांच्या भावनेशी द्रोह ठरेल! या सगळ्या प्रकरणात खरी वस्तुस्थिती काय आहे, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.

Advertisement

आई तुळजाभवानीच्या छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या शिल्पासारख्या श्रद्धेच्या विषयावर मंदिर समितीचा लपवाछपवीचा खेळ सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी शिल्पा बाबत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आई तुळजाभवानी देवीचे शिल्पातील रूप अष्टभुजा की द्विभुजा असलेले असावे याबाबत समितीने मागवलेल्या अहवालावरून मंदिराचे विश्वस्त आणि अध्यक्षांमध्ये विरोधाभास आहे. 


 

Topics mentioned in this article