Tuljabhavani Shardiya Navratri Festival: तुळजापुरातील नवरात्रोत्सवाला विशेष दर्जा, राज्य सरकारची मोठी घोषणा

Navratri Festival in Tuljabhavani Temple: या महोत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून 50 लाख भाविक तुळजापुरात येतील, असा अंदाज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Tuljabhavani Shardiya Navratri Festival: तुळजापुरातील नवरात्रोत्सवाला विशेष दर्जा, राज्य सरकारची मोठी घोषणा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव आता राज्याचा एक प्रमुख महोत्सव म्हणून ओळखला जाईल. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक निर्णयामुळे तुळजापूरसह धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. हा महोत्सव 22 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर, 2025 दरम्यान घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत साजरा होईल.

नक्की वाचा: Cabinet Meeting: अ‍ॅनिमेशन, VFX, गेमिंग धोरण जाहीर! विद्यार्थ्यांनाही दिलासा.. मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात काय काय होणार ?

या दहा दिवसांच्या महोत्सवामध्ये स्थानिक लोकपरंपरा आणि कलांना विशेष स्थान देण्यात आले आहे. गोंधळी गीत, भारुड आणि जाखडी नृत्यासारख्या लोककलांचे सादरीकरण होणार आहे. तसेच, धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून 50 लाख भाविक तुळजापुरात येतील, असा अंदाज आहे.

ड्रोनचा लाईट शो प्रमुख आकर्षण

या महोत्सवातील मुख्य आकर्षण 300 ड्रोनचा लाईट शो असेल, जो नवरात्रीच्या थीमवर आधारित असेल. याशिवाय, स्थानिक तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील. जे भाविक उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे.

नक्की वाचा: ITR Filling Process: उद्यापासून 5000 दंड, ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस.. घरबसल्या 5 मिनिटात असा करा फाईल

पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि युट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/@MaharashtraTourismOfficial), महोत्सवाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल, ज्यामुळे देश-विदेशातील भाविक आणि पर्यटक या उत्सवाचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्याख्याने, चित्रकला स्पर्धा आणि मॅरेथॉन यांचे आयोजन करण्यात येईल. फॅम टूरचे आयोजन, पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह, फेअर इव्हेंटचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवामुळे तुळजापूर परिसरातील नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर आणि परांडा किल्ला यांसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. यामुळे स्थानिक पर्यटनाला गती मिळेल आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
 

Advertisement