अहमदनगर हादरलं! क्षुल्लक कारणावरुन दीराचा भावजयांवर कोयत्याने हल्ला, दोघींचा मृत्यू

अकोले तालुक्यातील बेलापूर गावात भरवस्तीत खुनाचा हा थरार घडलाय. दोन्ही महिला घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असताना बेलापूर गावातील माजी पोलीस पाटील शिवाजी फापाळे, पोलीस पाटील राहुल यांनी अकोले पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनिल दवंगे, शिर्डी

अहिल्यानगर (अहमदनगर) दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. अकोले तालुक्यातील बेलापूर गावात दिराने आपल्या दोन भावजयांना संपवल्याची घटना समोर आली आहे. दीर माथेफिरु असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर आरोपी दीर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखला केला असून आरोपीचा शोध आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावात गजबजलेल्या भर वस्तीत ही घटना घडली. एका माथेफिरू दीराने किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भावजयांचा धारदार कोयत्याच्या साहाय्याने निर्घृण खून केला. उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे अशी दोन्ही मृत महिलांची नावे आहे. दत्तात्रय उर्फ बापू फापाळे असं आरोपी दीराचं नाव आहे. 

(नक्की वाचा-  तरुणीने आई-वडिलांसह घरातील 13 जणांना जेवणात विष टाकून संपवलं; कारणं ऐकून सगळे चक्रावले)

अकोले तालुक्यातील बेलापूर गावात भरवस्तीत खुनाचा हा थरार घडलाय. दोन्ही महिला घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असताना बेलापूर गावातील माजी पोलीस पाटील शिवाजी फापाळे, पोलिस पाटील राहुल यांनी अकोले पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.

(नक्की वाचा-  एकच शाळा, एकच दोर, एकच खांब; प्रेमाचं असं वेड की युगुलाने एकत्रच संपवली जीवनयात्रा)

घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे बेलापूर गावातील घटनास्थळी पोहोचले. तेथे घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळेचा पोलीस शोध घेत आहेत. 
 

Topics mentioned in this article