जाहिरात

तरुणीने आई-वडिलांसह घरातील 13 जणांना जेवणात विष टाकून संपवलं; कारणं ऐकून सगळे चक्रावले

न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, खैरपूरजवळी हैबत खान ब्रोही गावातील ही घटना आहे. तरुणीला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचं होतं. मात्र तिच्या घरचे लोक यासाठी तयार नव्हते.

तरुणीने आई-वडिलांसह घरातील 13 जणांना जेवणात विष टाकून संपवलं; कारणं ऐकून सगळे चक्रावले

पसंतीच्या मुलासोबत लग्न करु न दिल्याने तरुणीने आई-वडिलांसह 13 जणांना संपवल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रातांतील या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तरुणीने जेवणात विष टाकून घरातील मंडळींची हत्या केल्याचं मान्य केलं आहे. पोलिसांनी या तरुणीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, खैरपूरजवळी हैबत खान ब्रोही गावातील ही घटना आहे. तरुणीला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचं होतं. मात्र तिच्या घरचे लोक यासाठी तयार नव्हते. तरुणीला काहीही करुन आपल्या प्रियकरासोबतच लग्न करायचे होते. त्यामुळे तरुणीने प्रियकरासोबत मिळून एक कट रचला. 

(नक्की वाचा- 15 लाखांची गर्दी, 5 मृत्यू, शेकडो रुग्णालयात; चेन्नईत वायुसैन्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीचं कारण काय?)

तरुणीने प्रियकराच्या मदतीने विष देऊन घरच्यांना संपवण्याचं ठरवलं.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणानंतर घरातील अनेकांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम केलं त्यावेळी सर्वांना जेवणात विष दिल्याचं समोर आलं.

(नक्की वाचा-  एकच शाळा, एकच दोर, एकच खांब; प्रेमाचं असं वेड की युगुलाने एकत्रच संपवली जीवनयात्रा)

पोलिसांना घटनेचा कसून तपास केला त्यावेळी समोर आलं की तिने पीठामध्ये विष मिसळलं होतं. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतल आणि चौकशी केली. त्यावेळी तिने गु्न्ह्याची कबुली दिली. माझ्या पंसतीच्या मुलासोबत लग्न करण्यास घरचे तयार नव्हते. म्हणून मी हे कृत्य केल्याचं तिने पोसिसांना सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
परराष्ट्रमंत्री जयशंकर करणार पाकिस्तानचा दौरा, मोदी सरकारनं 9 वर्षानंतर का घेतला निर्णय?
तरुणीने आई-वडिलांसह घरातील 13 जणांना जेवणात विष टाकून संपवलं; कारणं ऐकून सगळे चक्रावले
Holocaust researchers in Israel use AI to search for unnamed victims
Next Article
नरसंहारातील अज्ञातांची ओळख पटविण्यासाठी AI चा वापर करणार