Uddhav Thackeray on MNS : 'बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही', मनसेच्या बॅनरवर उद्धव ठाकरेंची टीका

30 तारखेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क दादर येथे होणार आहे. या मेळाव्यापूर्वीच मनसे वादात अडकली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

30 तारखेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क दादर येथे होणार आहे. या मेळाव्यापूर्वीच मनसे वादात अडकली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यानिमित्ताने लावलेल्या मनसेच्या बॅनरवर थेट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आपला फोटो वापरू नये असं सांगितलं होतं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसेच्या सुरुवातीच्या काळात मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचे फोटो पाहायला मिळत होते. मात्र बाळासाहेबांच्या सूचनेनंतर आतापर्यंत कोणीही बाळासाहेबांचे फोटो मनसेच्या बॅनरवर लावले नव्हते. 

नक्की वाचा - Uddhav Thackeray : 'अपयश लपवणारं अधिवेशन', उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

मात्र इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच मनसेच्या पोस्टवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनीही मनसेवर टीका केली आहे. सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे यातून दिसतंय. जर महाराष्ट्रात जिंकायचं असेल, गद्दारांनी देखील बाळासाहेबांचा फोटो वापरला होता. तसाच सगळ्यांना आता बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अस उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.