उद्धव ठाकरे यांनी नुकतच निवृत्त सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला आहे. सरन्यायाधीशांनी आमदार अपात्रता प्रकरणावर अद्याप निर्णय न दिल्याने निराशा व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टीकाकार झाले आहेत. जर ते सरन्यायाधीशांऐवजी कायद्याचे व्याख्याते झाले असते तर त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली असती.
नक्की वाचा - 'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री झालेलं बघायचंय ना?' पवारांचे खासदार असं का बोलले?
ते पुढे म्हणाले, वर्तमान भाजपचं नेतृत्व धूर्त आहे. मात्र काँग्रेस नेतृत्वाकडून सन्मान दिला जातो आणि संमतीसह काम करतात. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि खर्गेंनी नेहमीच सन्मान दिला. आम्ही सत्तेत नसतानाही सन्मानाने वागवलं. आज भाजपच्या नेतृत्वाशी तुलना केली तर काँग्रेसमध्ये जास्त माणुसकी आहे. आजही भाजप फायदा करून घेते आणि फेकून देते. जर भाजपचे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र संपुष्टात येईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न नाही, महाराष्ट्राला वाचवायचंय..
उद्धव ठाकरेंनी हेदेखील स्पष्ट केलं की, मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत नाही. महाराष्ट्राचं शोषण करणाऱ्यांना हरवणं हे प्रथम कर्तव्य आहे. अमित शाहांनी आता फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा संभावित उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी याला सहमती दिली आहे का? भाजपसोबत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार आहेत? असं कधीच होणार नाही. कारण यंदा महाविकास आघाडीचं सरकार येईल.