
मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर आणि उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर मातोश्रीवर पहिल्यांदा घेऊन जाणारे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी भावनिक पत्र लिहीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
तत्पुर्वी जितेंद्र जानावळे यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर बोलावले होते. दोघांमध्ये अर्धा तास चर्चाही झाली. मात्र त्यानंतरही त्यांनी पक्षाला सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांच्याशी एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी श्रीरंग खरे आणि विनोद तळेकर यांनी संवाद साधला. यावेळी मुलाखतीत बोलताना जानावळे यांनी बाळासाहेब ठाकरे ते उद्धव ठाकरेंपर्यंतच्या शिवसेनेचा उल्लेख करत पक्षातील बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले जितेंद्र जानावळकर?
"मी उभारलेला हा लढा माझ्या शिवसैनिकांसाठी आहे.. मी आज उद्धव ठाकरेंना भेटलो. माझ्या राजीनाम्यामध्येही मी खंत व्यक्त केली. मी रडणारा नाही लढणारा कार्यकर्ता आहे. मात्र एक असा नेता असतो, तो असा काहीतरी स्वतःचा प्रभाव पाडायला बघतो.. त्याला मातोश्रीचा एक्सेस असतो. असे आमचे विभागप्रमुख साहेब, विभागप्रमुखही तेच आणि मंत्रीही तेच. सर्वच लाभाची पदे त्यांनी घेतली. आमची पक्षाकडून जास्त अपेक्षा नाही, मात्र माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक वेटिंगवर आहेत, मात्र ते बोलू शकत नाहीत," असे म्हणत अनिल परब यांच्यावर थेट निशाणा साधला.
अनिल परब, संजय राऊतांवर आरोप...
"मी गेली महापालिकेची निवडणूक फक्त 250 मतांनी हरलो. त्यावेळी कमी मताने हरल्याने मला त्याच प्रभागात ठेऊन मला ताकद देऊन पुन्हा हा वॉर्ड, महापालिका जिंकायची आहे म्हणत ताकद देण्याची गरज होती. मात्र मला थेट वांद्रे विधानसभेत टाकले, ज्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी तरीही काम केले वारंवार माझ्या विभागात घ्या.. अशी विनंती केली, मात्र माझे ऐकले नाही. मला विधानसभा देतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यावेळीही मला डावलले. विधानसभेला तर कहर म्हणजे अनिल परब आणि संजय राऊतांनी कोणालाही विश्वास न घेता आपण विलेपार्लेची जागा जिंकत नाही असा अहवाल दिला आणि ही जागा 'आप'ला देऊन टाकली, असा आरोप जानावळेंनी केला.
मुळात "संजय राऊत आणि अनिल परब यांना हा अधिकार कुणी दिला? शिवसैनिकांच्या विचाराची जागा तुम्ही आपला देता? म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या विचारापासून किती फारकत घेतली आहे? सुदैवाने उद्धव ठाकरेंनी चर्चा करुन ती जागा पुन्हा आम्हाला मिळवून दिली.." असे म्हणत या मुलाखतीत जानावळेंनी थेट ठाकरेंच्या खास शिलेदारांवरच हल्ला चढवला.
नक्की वाचा- Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)
घर गेलं, नोकरी गेली...
"माझ्यावर आत्ताही 15- 16 केसेस आहेत, अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांचा मार खाल्ला. आजही चालताना त्रास होतो. मी गेल्या निवडणूकीत माझी नोकरी गेली, घर गेले. सगळं सोडून मी निवडणूक लढलो, दुर्दैवाने हरलो. गेल्या दोन महिन्यात घरासाठी फिरलो. टेम्पोमध्येही झोपलो, मात्र कधीही या अडचणी घेऊन कधी मातोश्रीवर गेलो नाही. सत्ता आल्यानंतरही शिवसैनिकाला काय मिळाल? असा उद्गिन्न सवाल त्यांनी उपस्थित केला.
"आम्हाला कोर्टाच्या केसेस लढायलाही पैसे नसतात पण पक्षाने कधी मदत केली नाही,आम्हीही कधी मागितले नाहीत. परवाच नवनीत राणाच्या केसमध्ये वीस हजार रुपये वकिलाला दिले. आम्हाला कोणी द्यायला आले का? आंदोलनात सगळे नेते चमकले पण केसेस शिवसैनिकांवर. त्याकडे कधी लक्ष देणार आहात का? सत्ता आल्यानंतरही आमच्या केसेस मिटवण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. पक्षासाठी आंदोलने, मोर्चे करु नोकरी घरदार सगळं गमावलं. त्यामुळे हा लढा माझ्यासाठी नाही, सर्व शिवसैनिकांसाठी आहे. माझ्या पत्रातून उद्धव ठाकरेंनाही समजलं असेल." असंही जितेंद्र जानावळे म्हणाले.
( नक्की वाचा : मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही! मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा )
उद्धव ठाकरेंनी कणखर व्हावे...
"उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारखे कणखर व्हावेत. आज शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनी माझ्यासमोर अनिल परबला बसवून चर्चा केली असती. मात्र उद्धव ठाकरेंनी एकट्याने चर्चा केली. म्हणजे नेत्यांनी संघटनेचं नुकसान करावे, मग आता कार्यकर्त्यांनी संघटनेच्या हिताचा निर्णय घेतला तर कुठे बिघडलं? असे म्हणत उद्धव ठाकरे स्वबळावर उभे राहिले असते तर ही वेळ आली नसती.. असेही जानावळेंनी यावेळी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world