
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बंडखोर नेत्या प्रीती बंड आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना मेळाव्यात प्रीती बंड शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटातील प्रीती बंड बडनेर विधानसभा जागेसाठी इच्छुक होत्या. मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर प्रीती बंड यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनंतर ठाकरे गटाने त्यांचं निलंबन केलं होतं. दरम्यान आता प्रीती बंड एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या प्रीती बंड यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे गटातून बडतर्फ केल्यानंतर माझी घरवापसीची इच्छा होती पण मला बोलावलं नाही. पराभवानंतर शिंदेंनी आपुलकीने विचारपूस केली, म्हणून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया प्रीती बंड यांनी दिली आहे.
नक्की वाचा - Sharad Pawar's Big Statement : पक्षातील अनेक नेते अजित पवारांसोबत जाण्यास इच्छूक; शरद पवारांची कबुली
दरम्यान स्थानिक नेत्यांमुळे गेल्या विधानसभेत माझं तिकीट कापलं गेलं, असा धक्कादायक खुलासाही प्रीती बंड यांनी NDTV मराठीशी बोलताना केला.
दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी 2014 आणि 2019 मध्ये रवी राणा यांच्या विरोधात विधानसबा निवडणूक लढवली होती. 2014 च्या विधानसभेत ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची त्याची इच्छा होती. मात्र ठाकरे गटाकडून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. यानंतर बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world