विशाल पाटील, मुंबई: राज्यात हिंदी भाषेवरुन वाद सुरु असतानाच आता महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 या कायद्यावरुन सत्ताधारी विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. हे विधेयक संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात आहे, असं अनेक संघटनांचे म्हणणे आहे. या कायद्याला महाविकास आघाडीकडून जोरदार विरोध असून आज मुंबईतील आझाद मैदानावर विरोधकांनी आंदोलनही केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर करु देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे.
नक्की वाचा: "5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार", राज ठाकरे यांची घोषणा
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"इंदिरा गांधींनी सांगून आणीबाणी लावली मात्र गेल्या १० वर्षांपासून अघोषित आणीबाणी आहे त्याचा विरोध कोण करणार? जर लढणार असेल तर शिवसेनासोबत आहे. या अधिवेशनामध्ये हे महाराष्ट्र कायदा सुरक्षा विधेयक आणू इच्छित आहेत. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे मात्र रस्त्यावर आमची सत्ता आहे. कालच त्यांना दणका दिला आहे. तसेच हे विधेयकह आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचे स्वप्न बघु नका. महाराष्ट्रातील कानाकोपण्यात याला विरोध करु," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
तसेच "भाजप सत्तांध झाला असेल तर त्याच्या डोक्यावर प्रहार करायला महाराष्ट्र खंबीर आहे. भ्रष्टाचार करु नका, गोरगरिबांना छळू करु नका. जस काल मराठी माणूस मतभेद विसरुन एकत्र आला तसंच पुन्हा एकदा मराठी माणसाने एकत्र येऊन सरकारला गुडघ्यावर आणावे लागेल. सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील. मात्र पाशवी बहुमताने हे विधेयक मंजूर केले तर आपल्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरची लढाई लढावी लागेल," असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
Raj Thackeray: 'ही भीती असली पाहीजे', हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर राज ठाकरेंचे सुचक वक्तव्य