ठाणे:
सध्या राज्यभरात सभांचा धुरळा सुरू आहे. 16 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा होती. यावेळी स्टेजचा काही भाग खचल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी भेटत असताना स्टेजच्या काही भाग अचानक खचला. ज्यावेळेस स्टेजचा भाग खचला त्यावेळेस उद्धव ठाकरे स्टेजवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात स्टेजवर गर्दी झाली असल्याने स्टेजचा काही भाग खचल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ताबडतोब प्रसंगावधान राखून स्टेजवरील उद्धव ठाकरे आणि इतर लोकांना खाली उतरवण्यात आले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.