Ujani Dam : भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, उजनी धरण 87.68 टक्के क्षमतेने भरलं..

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस झाल्यामुळे सध्या उजनी धरणात 20 हजार 167 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा प्रवाह येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

पुणे-सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेलं उजनी धरण (Ujani Dam) 110 पूर्णांक 63 टीएमसी क्षमतेने भरलं असून उजनी धरणातून आज सकाळी दहा वाजल्यापासून भीमा नदी पात्रात 10 हजार क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. यामध्ये कमी अधिक प्रमाणात वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून भीमा नदी पात्रात हे पाणी सोडले जाणार आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस झाल्यामुळे सध्या उजनी धरणात 20 हजार 167 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा प्रवाह येत आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून ही पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून भीमा नदी पात्रात 10 हजार क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे.

नक्की वाचा - Mumbai News: मध्य वैतरणा धरणाचे 90 टक्के भरले! 3 दरवाजे उघडले

    उजनी धरणाची एकूण पाणी साठवणूक क्षमता 123 टीएमसी इतकी आहे. ज्यावेळी उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरते, त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा मावतो. आजच्या स्थितीला उजनी धरण 87 पूर्णांक 68 टक्के भरलं असून उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 110 पूर्णांक 63 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. लवकरच उजनी धरण हे 100 टक्के क्षमतेने भरल जाईल.

    Topics mentioned in this article