Pune News: पुणे शहरात भुयारी मार्गाची उभारणी होणार, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मास्टर प्लॅन!

शहरामध्ये  भूमिगत रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे:  पुणे शहरातील  वाहतूक कोंडी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ट्राफिक होत असल्याने नागरिकांची, नोकरदारांची मोठी गैरसोय होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शहरामध्ये  भूमिगत रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत.

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महामेट्रो, पुणे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून पायाभूत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला स्थानिक आमदार हेमंत रासणे या बैठकीला उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, गृह राज्यमंत्री श्री. योगेशजी कदम आदी नेते उपस्थित होते. 

Pune News: पुणेकरांनो सावध व्हा! तुमच्यावर असणार आहे आता फिरत्या कॅमेऱ्याची नजर

यावेळी पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांच्या निर्मितीचे नियोजन करण्याची सूचना, यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली आहे. यामुळे आपल्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असणाऱ्या शनिवारवाडा ते स्वारगेट आणि  सारसबाग ते शनिवारवाडा या भुयारी मार्ग प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. 

 शहरातील मध्यवर्ती भागात दीर्घकालीन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भूमिगत रस्त्यांचे जाळे विकसित करण्यास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. गुरुवारी पालिका आयुक्त किशोर राम यांनी आमदार हेमंत रासने आणि पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्यासमवेत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून वाहतूक परिस्थितीचा आढावा घेतला. पुणे महानगरपालिका (पीएमसी) अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करत आहे.

नक्की वाचा - Pune News : पोलिसांच्या वाहनामुळेच चाकणमध्ये वाहतूक कोंडी, सामान्यांच्या त्रासात भर