धनंजय साबळे, अकोला
अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम सुरु आहे. या खोदकामादरम्यान जवळपास 200 वर्ष जुने भुयारासारखी दिसणारी पुरातन इमारत जमिनीमध्ये आढळली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या अनुषंगाने श्री राजराजेश्वर मंदिराच्या मागे लागूनच असलेल्या शिकस्त झालेल्या जुन्या इमारतीला पाडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आज सकाळी या ठिकाणी खोदकाम सुरू असताना 200 ते 250 वर्ष जुने भुयार सारखी दिसणारी पुरातन इमारत जमिनीमध्ये आढळल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
नक्की वाचा- गोदान एक्स्प्रेसच्या डब्यातून अचानक निघू लागला धूर, प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या
या भुयाराच्या आतमध्ये असलेल्या पुरातन दगडांवर खूप वर्षांपूर्वी जय बजरंग बली, जय भोलेनाथ तसेच जय श्री राम लिहिलेले सुद्धा आढळून आले आहे. या भुयाराच्या आतमध्ये 2 छोट्या खोल्या दिसत आहेत. या बरोबरच भुयारात अंधार झाल्यास कंदील लावण्यासाठी छोटे कोरीव काम केलेली भगदाडसुद्धा आहे.
( नक्की वाचा : 'हिंदू मुली हा लुटीचा माल नाही', पाकिस्तानच्या खासदारानं सरकारला सुनावलं, Video )
जीर्णोद्धारादरम्यान सापडलेले हे भुयार कशासाठी तयार करण्यात आले असावे, याचा शोध घेतला जात आहे. राजेश्वर शिवलिंग मंदिराच्या समोर शिवकालीन गड किल्ला आहे. या किल्ल्यासमोरही अकोल्यापासून ते बाळापूरपर्यंत एक भुयार असल्याचं जुनी लोकं सांगतात.