Nitin Gadkari : 'मलाच लाज वाटते, मला परत बोलावू नका,' नितीन गडकरी का चिडले?

या भूमिपूजनाला मला बोलू नका कारण आता मलाच लाज वाटते असे म्हणत कॉन्ट्रॅक्टर का टिकत नाही असा सवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उपस्थित केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
शिर्डी:

सुनील दवंगे, प्रतिनिधी


अहिल्यानगर शिर्डी महामार्गाची टेंडर प्रक्रिया चौथ्यांदा पूर्ण झाली आहे. या महामार्गाचे लवकरच  काम सुरू होईल. मात्र या भूमिपूजनाला मला बोलू नका कारण आता मलाच लाज वाटते असे म्हणत कॉन्ट्रॅक्टर का टिकत नाही असा सवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उपस्थित केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, अहमदनगर - शिर्डी महामार्गाचे टेंडर काढले आहे. मला माहित नाही चांगला काॅन्ट्रॅक्टर मिळेल की नाही ? कारण ते माझ्या हातात नाही. मात्र आशा करूया आता तरी हे रखडलेले काम चांगले होईल. सुरत ते चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्यात मोठा विकास होणार आहे. पुढच्या एक महिन्यात कामाला केंद्रीय कॅबिनेटची मंजूरी मिळल्यानंतर तातडीने कामाला वेग येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहे. त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच पैसे मिळतील.

( नक्की वाचा : Good News : ST च्या खर्चात होणार दरवर्षी 235 कोटींची बचत, परिवहन मंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला )
 

आत्तापर्यंत तीन वेळी या महामार्गाचे टेंडर काढले आणि रद्द झाले. त्या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकून त्यांची बँक गॅरंटी जप्त करण्याचे आदेश दिले. यावेळी गडकरी यांनी नगर- शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल आपल्या मनातील खंत उघडपणे बोलून दाखवलीये..

 डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या देह वेचावा कारणी या आत्‍मचरित्राच्‍या दुस-या आवृत्‍तीचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या उपस्थितीत झाले.  त्याचबरोबर नितीन गडकरी यांच्या हस्ते  जिल्ह्यातील 326 कोटी रुपये किमतीच्‍या नांदुर शिंगोटी ते कोल्‍हार या 160 डी या राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या 47 कि.मी रस्‍त्‍याची सुधारणा, 750 कोटी रुपये किमतीच्‍या नगर सबलखेड, आष्‍टी, चिंचपूर 50 कि.मी चा रस्‍ता, 390 कोटी रुपयांच्‍या बेल्‍हे, अळकूटी, निघोज, शिरुर आणि 11 कोटी रुपये किमतीच्‍या श्रीगोंदा शहरातील पुलाच्‍या कामाचा कामांचा शुभारंभ झाला. 

Topics mentioned in this article