Maharashtra Rain Alert : अद्यापही पाऊस परतलेला नाही, त्यामुळे हवामान विभागाकडून राज्यातील 13 जिल्ह्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
आजपासून पुढील तीन दिवस मुंबईत हलक्या सरीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. पावसाची वातावरण आहे. पुढील तीन दिवसात मुंबईत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी तयारीनिशी बाहेर पडावे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
- रायगड
- रत्नागिरी
- पुणे
- सातारा
- नाशिक
- अहिल्यानगर
- बीड
- धाराशिव
- लातूर
- जालना
- छत्रपती संभाजीनगर
- धुळे
- जळगाव
सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यत मान्सून महाराष्ट्रातून बाहेर पडतो. यंदा मान्सून परतीचे दिवस वाढल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारपासून (१७ ऑक्टोबर) दिवाळीला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी वसूबारस आहे. तर दुसऱ्या दिवशी १८ ऑक्टोबर, शनिवारी धनत्रयोदशी आहे. त्यानंतर २० ऑक्टोबरला, नरक चतुर्दशी आहे. या दिवसात राज्यातील कित्येक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.