Vaishnavi Hagawane: वैष्णवीचा अमानुष छळ, मृत्यूआधी 6 दिवस मारहाण? अंगावर 29 जखमा, धक्कादायक रिपोर्ट समोर

या प्रकरणात पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी सोमवारी दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीच्या पतीसह सासरे, सासू, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये वैष्णवीचा खून झाल्याचाही संशय व्यक्त केला होता. अशातच आता वैष्णवीला कुटुंबियांनी केलेल्या अमानुष मारहाणीबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार,  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली आहे.  आत्महत्या केल्याच्या दिवशी वैष्णवीला सासरकडील लोकांकडून मारहाण झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे.  शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर 29 जखमा आढळल्या आहेत. त्यापैकी 15 जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणात पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी सोमवारी दिले.

वैष्णवीच्या अंगावर एकूण 30 जखमा आढळल्या आहेत. त्यापैकी 29 जखमा या शवविच्छेदनापूर्वीच्या आहेत. 15 जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत. एक जखम मृत्यूच्या चार ते सहा दिवस आधी झाली आहे. 11 जखमा या मृत्यूपूर्वी 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या आहेत. दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(नक्की वाचा: Mumbai Rain Red Alert: मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS)

वैष्णवीला पाईपने मारहाण केली तो पाईप पोलिसांनी जप्त केला आहे. एक दुचाकी, हुंड्यात मिळालेली महागडी मोटार, चांदीची भांडी, दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. पाच आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत,

Advertisement

दरम्यान,  आरोपींनी हुंड्यामध्ये मिळालेले 51 तोळे सोन्याचे दागिने एका बँकेत तारण ठेवले आहे. दागिने तारण ठेवण्यामागचे कारण काय ? या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील नितीन अडागळे यांनी युक्तिवादात केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.