जाहिरात

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीच्या चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार? बाल कल्याण समितीचा मोठा निर्णय

चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार? असा सवाल प्रत्येकाच्या मनात येत होता. याबाबतच आता सर्वात मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीच्या चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार? बाल कल्याण समितीचा मोठा निर्णय

सुरज कसबे, पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. वैष्णवीच्या मृत्यूने तिचे 9 महिन्यांचे बाळ पोरके झाले. या चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार? असा सवाल प्रत्येकाच्या मनात येत होता. याबाबतच आता सर्वात मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैष्णवी हगवणे  हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीच्या  मृत्यूपश्चात तिचे 9 महिन्यांचे बाळ याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने आजी वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.

(नक्की वाचा-  BLA Attack: बलूच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानातील शहरावरच कब्जा, सरकारी कार्यालये ताब्यात)

यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल, अशा आशयाची X वर पोस्ट महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com