Vaishnvi Mahadik Comeback On Instagram: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामपासून काही दिवस दूर राहिल्यानंतर अखेर वैष्णवी महाडिक यांनी कमबॅक केलंय. इतक्या दिवसांनंतर त्यांची पहिली पोस्ट पाहिल्यानंतर चाहते सुखावले आहेत. वैष्णवी महाडिक यांनी त्यांचे तीन फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये त्यांचा पारंपरिक पेहराव दिसतोय. या फोटोमध्येही त्या नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहेत.
वैष्णवी महाडिकांच्या कमबॅकनंतरची पहिली पोस्ट, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस
या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. 'वेलकम बॅक वहिनी साहेब', 'आम्हाला तुमची खूप आठवण येत होती', 'जोरदार कमबॅक', 'सुंदरी', 'क्वीन', 'क्वीन इज बॅक', 'तुम्हाला पुन्हा पाहून आनंद झाला' अशा आशयाचे कमेंट्स करत चाहत्यांनी हार्ट इमोजीही शेअर केल्या आहेत.
Vaishnvi Mahadik First Post After Comeback On Instagram

Photo Credit: Vaishnavi Mahadik Instagram
इतके दिवस गायब का झाल्या होत्या?
दरम्यान वैष्णवी महाडिक इन्स्टाग्रामवरून अचानक गायब का झाल्या होत्या, असाही प्रश्न फॉलोअर्स विचारत आहेत. त्यांचे इन्स्टा अकाउंट दिसेनासे झाल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला होता. पण ही पोस्ट पाहिल्यांतर त्यांचे फॉलोअर्स प्रचंड खूश झाले आहेत.

Photo Credit: Vaishnavi Mahadik Instagram
कोण आहेत वैष्णवी महाडिक? | Who Is Vaishnvi Mahadikवैष्णवी महाडिक या कोल्हापुरातील उद्योजक पृथ्वीराज महाडिक यांच्या पत्नी आहेत. पृथ्वीराज हे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र आहेत. महाडिक कुटुंबातील थोरल्या सूनबाई वैष्णवी महाडिक सोशल मीडियावर त्यांच्या सामाजिक कार्याचे तसेच कौटुंबिक क्षणांचीही माहिती फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्या प्रसिद्ध यू-ट्युबर कृष्णराज महाडिक यांच्या वहिनी आहेत.

Photo Credit: Vaishnavi Mahadik Instagram
वैष्णवी महाडिक या एखाद्या हीरोईनप्रमाणे सुंदर दिसतात, पाहुया त्यांचे काही फोटो | Vaishnvi Mahadik Photos | Vaishnvi Mahadik Insta PostTrack Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world