Vasai News: कार्यालयात बोलावलं, बविआच्या कार्यकर्त्याला वळ उठेपर्यंत मारलं; भाजप नगरसेवकावर गुन्हा

बविआच्या कार्यकर्त्याला कार्यालयात बोलावून लाकडी दांड्याच्या उपट्या घालून बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. रवी भरत झा असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, वसई:

Vasai News: वसईमध्ये भारतीय जनत पक्षाच्या नगरसेवकाने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याला कार्यालयात बोलावून मारहाण केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकीत शिट्टीच्या उमेदवाराला मदत केल्याच्या रागातून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप नगरसेवक गणेश पाटीलसह अन्य  ४–५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बविआच्या कार्यकर्त्याला भाजप नगरसेवकाकडून मारहाण

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  वसईतील प्रभाग क्रमांक १८ मधून प्रथमच निवडून आलेले भाजप नगरसेवक गणेश पाटील यांच्यावर मारहाणीचा गंभीर आरोप झाला आहे. बविआच्या कार्यकर्त्याला कार्यालयात बोलावून लाकडी दांड्याच्या उपट्या घालून बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. रवी भरत झा असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

Crime News: आईच्या कुशीतून मुलाला पळवलं, 3 लाखात विकलं, 20 तासांची शोधमोहिम अन् थेट...

रवी भरत झा (रा. गावराईपाडा, वसई पूर्व) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, “तू शिट्टीचा (BVA)कार्यकर्ता आहेस, शिट्टीच्या उमेदवाराला मदत करत होतास, शिट्टी वाल्यासोबत तुच फिरत होतास ना? पैसेही वाटत होतास, असं म्हणत मारहाण केली. सर्वांनी मिळून मला बेदम मारहाण केली. मी वारंवार विचारत होतो माझी काय चूक आहे? मात्र त्यांनी मारहाण सुरु ठेवली आणि आई बहिणीवरुन अश्लील शिवीगाळ केली. 

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल 

रस्ता व साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ बनवण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गणेश पाटील व अन्य ४–५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, गणेश पाटील यांनी आरोप फेटाळत, “वाद पाण्याच्या मुद्द्यावर होता. समजावण्यासाठी बोलावले होते; मारहाण केलेली नाही. माझ्यावर कट रचून गुन्हा दाखल केला आहे,” असे सांगितले असून न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

Khamenei's Death : खामेनेई यांच्या निधनानंतर 40 दिवसांचा शोक; इस्लाममध्ये चाळीसाव्या दिवसाचं महत्त्व काय आहे?