Vasai Crime: राँग साईडने आल्याने वाद, दुचाकीस्वाराला हटकल्याने जे घडलं; वसईमध्ये खळबळ

शफिक शेख यांनी संबंधित दुचाकीस्वाराला जाब विचारला. मात्र, या प्रश्नावरून वाद चिघळला आणि संतापलेल्या दुचाकीस्वाराने शेख यांना मारहाण केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, वसई:

Vasai Crime:  विरुद्ध दिशेने वाहन चालवण्यावरून झालेल्या वादातून एकाला बेदम मारहाण करत संपवल्याची घटना वसईमध्ये घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद अन् त्यातून एकाचा जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर दुचाकीस्वार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

Vasai News: 15 वर्षाचा पुतण्या, 65 वर्षांची आत्या, बंगल्यात घडला भयंकर कांड, पोलीस ही चक्रावले

वसईमध्ये पादचाऱ्याची हत्या 

याबाबत सविस्तर माहिती ्अशी की, वसईतील अंबाडी रोड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर वळण घेत एकाचा जीव घेतला आहे. विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत असल्याबाबत जाब विचारल्याने संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत पादचारी ठार झाला. शफिक शेख (वय, 47) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेवेळी नालासोपारा येथील ४७ वर्षीय शफिक शेख हे सोमवारी रात्री अंबाडी रोडवरील खाऊ गल्लीत उभे होते.

सुमारे साडेनऊच्या सुमारास अंबाडी रोडकडून पंचवटी हॉटेलच्या दिशेने एक दुचाकीस्वार वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवत विरुद्ध दिशेने येत होता. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत शफिक शेख यांनी संबंधित दुचाकीस्वाराला जाब विचारला. मात्र, या प्रश्नावरून वाद चिघळला आणि संतापलेल्या दुचाकीस्वाराने शेख यांना मारहाण केली.

आरोपीचा शोध सुरु

मारहाणी दरम्यान ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाणे येथे अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

Advertisement

Nagpur News : नागपुरात मुलींचं बेकायदेशीर वसतिगृह उघडकीस; 29 जणींची सुटका, नागा अर्जुन भंतेंविरोधात कारवाई

Topics mentioned in this article