जाहिरात
This Article is From Feb 17, 2026

Vasai News: 15 वर्षाचा पुतण्या, 65 वर्षांची आत्या, बंगल्यात घडला भयंकर कांड, पोलीस ही चक्रावले

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Vasai News: 15 वर्षाचा पुतण्या, 65 वर्षांची आत्या, बंगल्यात घडला भयंकर कांड, पोलीस ही चक्रावले
वसई:

मनोज सातवी 

आत्या ओरडल्याने संतापलेल्या अल्पवयीन पुतण्याने मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अल्पवयीन पुतण्यासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. दुर्गा बनसोडे वय वर्ष 65 असे मृत  महिलेचे नाव आहे.  त्या वसई पश्चिमच्या उमेनमान भागात  बऱ्हामपुर गावातील भिमाई बंगल्यात एकट्याच रहात होत्या. त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला. सुरूवातीला चोरीचा संशय आला होता. पण पोलीस तपासात हा खून असल्याचं स्पष्ट झालं. 

दुर्गा बनसोडे यांना दोन मुलं आहेत. विवाहित मुलगी बोईसरमध्ये तर मुलगा वालीव येथे रहातो. त्यामुळे बनसोडे या एकट्याच बंगल्यात रहात होत्या. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह बंगल्यात आढळून आला होता. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तपास सुरू केला होता. चौकशी केली असता बनसोडे यांचा 15 वर्षांचा पुतण्या तिला अधून मधून भेटायला येत होता ही माहिती मिळाली. त्यामुळे पोलीसांनी चौकशीसाठी पुतण्याला ताब्यात घेतला. त्याच्या वर्तवणूकीवरून त्याच्यावर संशय निर्माण झाला होता. 

नक्की वाचा - Love Story: “मेले तरी चालेल, पण समीरसोबतच राहणार!”, हिंदू तरुणीच्या ठाम भूमिकेमुळे हायव्होल्टेज ड्रामा

त्यामुळे पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर  त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पुतण्या नेहमीप्रमाणे आत्याला भेटायला आला होता. मात्र क्षुल्लक कारणावरून आत्या त्याला ओरडली होती. त्यामुळे पुतण्याला राग आला. त्याने आपल्या मित्राला तिथे बोलावून घेतले. आत्या बेसावध असताना पुतण्याने मागून तिच्या डोक्यावर बांबूने वार केला. त्यात बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांनी तिचा मृतदेह बेडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र त्यांना ते जमले नाही. 

नक्की वाचा - Success Story: वडीलांनी नातं तोडलं, मित्रांनी थट्टा केली, सर्व विरोध झुगारून यश मिळवणाऱ्या सीमाची कहाणी

त्यांनतर दोघे ही तिथून फरार झाले. दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत. आरोपी पुतण्याने शिक्षण अर्धवट सोडलं आहे. तिन महिन्यापूर्वी त्याने आत्याच्या घरात चोरी देखील केली होती. त्यामुळे दुर्गा बनसोडे यांनी घरातील सर्व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. शेवटी त्याच पुतण्याने आत्याचा घात केला. तिला ज्या वेळी आधाराची गरज होती त्याच वेळी त्यांचा जिव घेतला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय पुतण्यानेच हे कृत्य केल्यामुळे सर्व जण हादरून गेले आहेत. आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना आता काय शिक्षा होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

नक्की वाचा - ना खताचे टेन्शन,ना पाणी घालण्याची कसरत!, AI च्या मदतीने घरातच पिकवा शेती, जाणून घ्या भन्नाट तंत्रज्ञान

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com