Vasai News: महिला आमदारांची सिंघम स्टाईल! मध्यरात्री अवैध बारवर धाड; अधिकाऱ्यांची खरडपट्टी

स्टार सिटी जूचंद्र, वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व तसेच वसई ईस्ट-वेस्ट ब्रिज ते मधुबन, वसंत नगरी गेट, एव्हरशाईन वसई पूर्व या प्रमुख मार्गांची पाहणी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, वसई: वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची मध्यरात्री प्रत्यक्ष स्थळांवर भेट देऊन पाहणी केली.. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या दुरुस्ती, पॅचवर्क, पेवर ब्लॉकच्या कमांमध्ये दिसून आलेल्या निकृष्ट दर्जा, गुणवत्ता तसेच कामाची गतीबाबत नाराजी व्यक्त करत समंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत झापलं.

शिवाय नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कामे तातडीने, दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या. आमदार दुबे यांनी रात्री १२:०२ ते पहाटे ०५:०० वाजेपर्यंत वसई पूर्वेच्या अग्रवाल नाका परिसर, स्टार सिटी जूचंद्र, वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व तसेच वसई ईस्ट-वेस्ट ब्रिज ते मधुबन, वसंत नगरी गेट, एव्हरशाईन वसई पूर्व या प्रमुख मार्गांची पाहणी केली.

Mumbai Metro: गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ; भक्तांसाठी मेट्रोच्या अधिक फेऱ्या

दुसरीकडे,  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामांची पाहणीदरम्यान आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वसईत पहाटेपर्यंत सुरु असलेल्या नाईट लाईफच्या धिंगाण्याचा पर्दा फाश केला. वसईतील दत्तानी मॉल मधे 'विंग्स ऑन फायर' आणि 'पंखा फास्ट' हे बार २.३० वाजता पोलिसांच्या नाकावर टिच्चून, कायदा मोडून  सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले.

शिवाय येथे मोठ्या आवाजात डिजे वाजवला जात असल्याने  स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही वसई पोलिसांकडून  कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आमदार दुबे यांनी संताप व्यक्त केला. तर, मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरू असल्याचे दिसून आहे. त्यानंतर आमदार स्नेहा दुबे यांनी परिसरात उपस्तित असलेल्या पोलिसांना देखील चांगलेच फैलावर धरले. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

Advertisement

(नक्की वाचा - Nashik Crime: लग्नाच्या आमिषाने अत्याचार, घरी एकटी असताना नको ते केलं; अल्पवयीन मुलगी गर्भवती)

Topics mentioned in this article