
Mumabi News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 च्या सेवांच्या वेळेत वाढ केली आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत मेट्रो आता रात्री मध्यरात्री 12 वाजेपर्यंत धावणार आहे, असे एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रोने जाहीर केले आहे. गणेशोत्सवाचा आनंद भाविकांना साजरा करता यावा यासाठीच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 10 दिवसांच्या उत्सवासाठी लागू राहील.
वेळेत वाढ
अंधेरी पश्चिम (लाईन 2A) आणि गुंदवली (लाईन 7) या दोन्ही ठिकाणांहून शेवटची गाडी रात्री 12 वाजता सुटेल. याआधी ही सेवा रात्री 11 वाजता बंद होत होती.
(नक्की वाचा- Good News: महिलांना 'या' रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, कुठे सुरू झाले असे हॉस्पिटल?)
🚇✨ श्रीगणेशोत्सवासाठी महा मुंबई मेट्रो सेवा आता मध्यरात्रीपर्यंत! ✨🚇
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) August 23, 2025
आपल्या लाडक्या गणरायांच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. महाराष्ट्राची अस्मिता, लोकसंस्कृती आणि जल्लोषाचा उत्सव असणारा श्रीगणेशोत्सव भाविकांना आनंदानं साजरा करता यावा, यासाठी @MMRDAOfficial आणि
महा मुंबई मेट्रो… pic.twitter.com/YdNO4gEZVf
अतिरिक्त फेऱ्या
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार तसेच शनिवार आणि रविवारसाठी अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोमवार ते शुक्रवार 317 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त). गर्दीच्या वेळी दर 5.50 मिनिटांनी एक गाडी मिळेल. शनिवारी 256 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त) असतील. गर्दीच्या वेळी दर 8.06 मिनिटांनी एक गाडी उपलब्ध असेल. तर रविवारी 229 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त) असतील. या दिवशी दर 10 मिनिटांनी एक गाडी धावेल, आणि गरज पडल्यास अतिरिक्त फेऱ्यांचीही सोय केली जाईल.
(नक्की वाचा - Nashik Crime: लग्नाच्या आमिषाने अत्याचार, घरी एकटी असताना नको ते केलं; अल्पवयीन मुलगी गर्भवती)
मेट्रोची सध्याची स्थिती
सध्या, मुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) आठवड्याच्या दिवसांमध्ये 317 सेवा चालवते. यात गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटे 50 सेकंदांनी आणि कमी गर्दीच्या वेळी 9 मिनिटे 30 सेकंदांनी मेट्रो उपलब्ध असते. वीकेंडला 256 सेवा चालवल्या जातात. त्यात गर्दीच्या वेळी 8 मिनिटे 6 सेकंद आणि कमी गर्दीच्या वेळी 10 मिनिटे 25 सेकंदांनी मेट्रो धावते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world