Vasai News: दारुचं व्यसन सुटावं यासाठी रुग्णालयात दाखल केलं, पण 48 तासातच त्यानं जे काही केलं ते...

पण उपचार सुरू झाल्यानंतर 48 तासात त्यांनी आपले रंग दाखवले. त्यांनी एक प्लॅन केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
gemini AI Image
वसई:

मनोज सातवी 

दारुचं व्यसन सुटावं यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात. पण काहींना हे व्यसन सुटत नाहीत. ते दारू पिण्यासाठी मग कोणत्याही थराला जातात. किंवा काही ही करण्याची त्यांची तयारी असते. असाच एक प्रकार भाईंदरमध्ये समोर आला आहे. इथं एका अल्कोहोलिक असलेल्या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण 48 तास उलटत नाही तोच त्या रुग्णाने जे काही केलं त्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे. रुग्णालय प्रशासन ही या घटनेनं हादरून तर गेलच आहे पण सावध ही झालं आहे. 

भाईंदर पश्चिमेला पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आहे. या रुग्णालयात राकेश पोदार या रुग्णाला भरती करण्यात आलं होतं. हा रुग्णावर अल्कोहोलिक विड्रॉलबाबत उपचार केले जाणार होते. दारूचं व्यसन सुटावं यासाठी त्यांच्यावर उपचारही सुरू झाले. पण उपचार सुरू झाल्यानंतर 48 तासात त्यांनी आपले रंग दाखवले. त्यांनी एक प्लॅन केला. तो प्लॅन रुग्णालयातून पळून जाण्याचा होता. त्यांना जणू दारू बोलवत होती. ते रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर होते. तिथेच त्यांच्यावर उपचार केले जाणार होते. त्यांनी रुग्णालयात बाथरुम  कुठे आहे याची माहिती घेतली. 

नक्की वाचा - Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

त्यानंतर ते थेट बाथरूमकडे गेले. बाथरूमच्या खिडकीतून त्यांनी पळून जाण्याचा ठरवलं. त्यासाठी त्यांनी खिडकीला असलेल्या काचा ही काढल्या. पण ते त्यांना शक्य झालं नाही. ते त्या खिडकीमध्येच अडकले. ते कुठे गेलेत याची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर पळून जाताना खिडकीत अडकल्याचं लक्षात आलं. रुग्णालय प्रशासनाने तातडीने ही माहिती अग्निशमन दलाला कळवली. त्यांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. स्थानिक पोलिस ही तिथे दाखल झाले. त्यानंतर राकेश यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. पळून जाण्याचा त्यांचा डाव फसला. 

नक्की वाचा - Gaurav gogoi: 'पहलगाममध्ये दहशतवादी कसे घुसले, सरकार हे का सांगत नाही? गौरव गोगोईंचा पलटवार

रुग्णालयाच्या मार्फत स्थानिक पोलीस व अग्निशमन विभाग यांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस  आणि रुग्णालय प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. सुदैवाने वेळीच हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या राकेशवर वैद्यकीय निगराणीखाली उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे रुग्णालयातील अशा प्रकारच्या रूग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. रुग्णालय ही आता सतर्क झाले आहे. त्यांना आता विशेष निरिक्षणा खाली उपचार दिले जाणार आहेत.  

Advertisement