Marathi Hindi Row: 'मराठीत बोलू नको', कॉलेजबाहेर तरुणाला हॉकी स्टीकने बेदम मारहाण, मनसे आक्रमक

पीडित युवक पवने गाव (ऐरोली) येथील रहिवासी असून त्याने याच दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

वाशी: राज्यात सध्या मराठी- हिंदीचा वाद सुरु आहे. मुंबईमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरु असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका परप्रांतीयाने रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अशातच आता वाशीमधून मराठी बोलू नको म्हणत तरुणाला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

'मराठी'वरुन बरळणाऱ्या दुबेंना महिला खासदारांनी हिसका दाखवला! संसदेच्या लॉबीत घेरलं, नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशीतील एका कॉलेजबाहेर भाषेच्या वादातून 20 वर्षीय युवकावर हॉकी स्टिकने गंभीर मारहाण झाल्याची घटना  घडली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 जुलै 2025 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाशी येथील एका कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. पीडित युवक पवने गाव (ऐरोली) येथील रहिवासी असून त्याने याच दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीनुसार, मुख्य आरोपी फैजान नाईक याने पीडित युवकाशी मराठीत बोलल्याबद्दल आक्षेप घेतल्याने वादाची सुरुवात झाली. या वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले. फैजानसह आणखी तिघांनी मिळून पीडिताला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फैजानने थेट हॉकी स्टिकने डोक्यावर वार करून गंभीर जखम केली. अन्य आरोपींनी देखील त्याला जबरदस्तीने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळीच पडून होता.

Mumbai News : 'तुम्ही हिंदुस्तानी नाही का?' मराठीच्या वादावरुन घाटकोपरमधील महिलेचा Video Viral

दरम्यान, याबाबत मनसेकडून पोलिसांना निवेदन देण्यात आला आहे मराठीच्या भाषेवरून हा वाद झाला आहे. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी नोटीस दिली आहे. तसेच नवी मुंबई शहरांमध्ये अशाप्रकारे दादागिरी कोणी केली तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा मनसेने दिला आहे 

Advertisement