जाहिरात

'मराठी'वरुन बरळणाऱ्या दुबेंना महिला खासदारांनी हिसका दाखवला! संसदेच्या लॉबीत घेरलं, नेमकं काय घडलं?

Women MP From Maharashtra Vs BJP's Nishikant Dubey In Parliament: मराठीवरुन मुद्दाम बरळणाऱ्या दुबेंना आता काँग्रेसच्या महिला आमदारांनी चांगलाच दणका दिला आहे.

'मराठी'वरुन बरळणाऱ्या दुबेंना महिला खासदारांनी हिसका दाखवला! संसदेच्या लॉबीत घेरलं, नेमकं काय घडलं?

Women MP From Maharashtra Vs BJP's Nishikant Dubey In Parliament: राज्यात सध्या मराठी- हिंदीचा वाद जोरदार सुरु आहे. एकीकडे मराठीवरुन मनसेने आक्रमक भूमिका घेतली असतानाच भाजप खासदार निशिकांत दुबेंनी या वादात विनाकारण उडी घेतली होती. मुंबईतील लोक आमच्याच जिवावर जगतात असं म्हणत दुबेंनी ठाकरे बंधुंना आव्हान दिले होते. मराठीवरुन मुद्दाम बरळणाऱ्या दुबेंना आता काँग्रेसच्या महिला आमदारांनी चांगलाच दणका दिला आहे.

Nishikant Dubey: "आमच्या पैशांवर तुम्ही जगताय', हिंदी वादावरुन भाजप खासदार बरळले, थेट ठाकरेंना आव्हान!

दिल्लीमध्ये सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या महिला खासदारांनी चांगलेच धारेवर धरले. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी लॉबीमध्ये निशिकांत दुबेंना अडवले अन् जाब विचारला. 

"तुम्ही मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? तुमची ही कसली  भाषा? अशाप्रकारे वागणे-बोलणे योग्य नाही, अशी अरेरावी कदापी खपवून घेतली जाणार आहे. अशा कडक शब्दात वर्षा गायकवाड यांनी दुबेंना खडसावले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर खासदारांनीही निशिकांत दुबेंना जाब विचारला. महिला नेत्यांचा हा आक्रमकपणा पाहून निशिकांत दुबेंनी काढता पाय घेतला. दरम्यान, या प्रकरणाची संसद भवन परिसरात चांगलीच चर्चा सुरु  झाल्याचेही पाहायला मिळाले. 

काय म्हणाले होते निशिकांत दुबे?

निशिकांत दुबेंनी मराठीवरुन वादग्रस्त विधान केले होते. तुम्ही कोणाची रोटी खाताय? तिथे टाटा, बिर्ला आहेत रिलायन्स कोणाची महाराष्ट्रात युनिट नाहीयेत. टाटांची पहिली फॅक्टरी बिहार-झारखंडमध्ये लागली. आमच्या पैशांवर तुम्ही जगताय. तुम्ही कोणता टॅक्स आणताय ? कोणते उद्योग आहेत तुमच्याकडे ? खाणी आमच्याकडे आहेत; झारखंड, छत्तीसगगड, मध्य प्रदेश, ओडिशाकडे आहे. रिलायन्स, एसारने रिफायनरी ही गुजरातमध्ये लावली आहे. सगळे उद्योग गुजरातमध्ये येत आहे, असं ते म्हणाले होते, ज्यावरुन हा वाद सुरु झाला. 

Raj Thackeray Uddhav Thackeray: "म मराठीचा नाहीच… सत्तेचाच", भाजपचा राज-उद्धव यांच्यावर निशाणा

Listen to the latest songs, only on JioSaavn.com