
हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तिथीस प्रचंड महत्त्व असते. या तिथीस कित्येक व्रत आणि सण साजरे केले जातात. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा उपवास केला जातो. या दिवशी व्रत केल्यास महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते, असेही म्हणतात. महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. यंदा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 10 जून आणि 11 जून या दोन्ही दिवशी आहे. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेची तिथी 10 जून रोजी सकाळी 11.35 वाजेपासून ते 11 जून दुपारी 1.13 वाजेपर्यंत असणार आहे. तज्ज्ञांच्या मते वटपौर्णिमा 10 जूनला आहे आणि या दिवशीच उपवास - पूजा करावी.
वटपौर्णिमेच्या पूजेवेळी या चुका टाळा.. (Vat Purnima Puja chuka tala)
तुम्ही, तुमची मुलगी किंवा सून गर्भवती असेल तर वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. अशा वेळी वडाला धागा गुंडाळायचा नसतो किंवा झाडाला प्रदक्षिणा घालायच्या नसतात. कोरडी पूजा करायची असते.
गर्भवती महिलांनी वडाची पूजा केली तर चालेला का? (Pregnant women Vat Purnima Puja)
गर्भवती महिलांनी वडाची ओटी भरायची नसते. गर्भवती महिलांनी कोणाचीही ओटी भरायची नाही आणि स्वत:ची ओटी भरवून घ्यायची नसते
कोणत्या महिलांनी वडाची पूजा करू नये?
गर्भारपणाच्या सहाव्या महिन्यापर्यंतच्या महिला वडाचं पूजन करू शकतात. सातवा, आठवा आणि नववा महिना असेल तर गर्भवती महिलांनी पूजा करू नये.
गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचा उपवास करायचा का?
हे सर्व तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून आहे. तुम्हाला काही शारिरीक अडचणी नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास ठेवू शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world