Fact Check: भाविकांसाठी महत्त्वाचं! 25 फेब्रुवारीला शेगाव दर्शन बंद? व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या

२३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान दर्शन टाळावे, सर्व यात्रि निवास कमांडो ताब्यात असतील आणि सार्वजनिक दर्शन बंद राहील, असा मजकूर सोशल मीडियावर फिरत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलढाणा: 

Shegaon Gajanan Maharaj darshan not closed: 25 फेब्रुवारी रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म या संतनगरी शेगावच्या दौऱ्यावर येणार आहेत.  शेगांव येथे गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबीरा'चे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे, या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या दौऱ्यादिवशी शेगावमधील गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी बंद राहील, असा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दर्शन बंद ही फक्त अफवा..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेगाव येथे महामहिम द्रौपदी मुर्म यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  श्री संत गजानन महाराज संस्थान येथे दर्शन बंद राहणार असत्याचा मजकूर समाज माध्यमावा वेगाने प्रसारित होत आहे. या संदेशामुळे हजारो भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती महोदया शेगाव येथे भेट देणार असल्याने २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान दर्शन टाळावे, सर्व यात्रि निवास कमांडो ताब्यात असतील आणि सार्वजनिक दर्शन बंद राहील, असा मजकूर सोशल मीडियावर फिरत आहे.

Kalyan Shocking News: गर्दीचा थरार की विकृती? कल्याण स्टेशनवर डब्यात चढताना महिलेसोबत भयंकर घडलं...

काही काळ प्रतिबंध लागण्याची शक्यता

मात्र या संदर्भात पडताळणी केली असता संबंधित मजकूर चुकीचा व अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.  सर्वसामान्य भक्तांना दर्शनापासून वंचित ठेवण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सुरक्षा मंत्राच्या प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतीच्या भेटीदरम्यान काही काळासाठी मंदिर परिसरात हालचालीवर निबंध किंवा व्यवस्थात्मक बदल होऊ शकतात.  मात्र याचा अर्थ दर्शन पूर्णतः बंद राहील असा नाही.

दरम्यान, २५ फेब्रूवारी रोजी शेगांव येथे गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबीरा'चे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौ-याच्या अनुषंगाने कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी सुरक्षा व्यवस्थेची बहुस्तरीय तपासणी करण्यात येत आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी)