मनोज सातवी
एसटी बस प्रवाशांसाठी नेहमीच प्रथम प्राधान्य राहीली आहे. पण याच एसटी बसमध्ये अनेक घटना घडत असतात. कधी कधी सह प्रवासी आपसात भिडतात. तर कधी जागेवरून वाद होताना दिसतात. तसे वाद तर बस चालक-वाहक यांच्यात ही होताना अनेक वेळा पाहीले आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यातील सफाळे बस आगारात घडली आहे. इथं एक एस टी बस चालक थेट प्रवाशालाच भिडला. ऐवढेच नाही तर एसटीचा युनिफॉर्म काढून त्याने या प्रवाशा विरोधात बस आगारातच दंड थोपटले. त्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना तिथे बघ्यांची ही गर्दी झाली होती.
पालघर जिल्ह्यातील सफाळे बस आगारात बस उशिरा आल्याचा जाब एका प्रवाशाने एसटी बस चालकाला विचारला. त्याचा राग या बस चालकाला आहे. या रागाच्या भरात संतप्त झालेल्या चालकाने प्रवाशाला दमदाटी केली. अश्वजीत कांबळे असं या चालकाचं नाव आहे. त्याने यावेळी आपला युनिफॉर्म काढला. दंड थोपटले आणि त्या प्रवाशाला खाली उतर तुला बघतोच असं आव्हन दिलं. यावेळी तो अश्लील शिवीगाळ करत होता असा आरोप केला जात आहे. त्याची दादागिरी सुरू होती. यावेळी आगारात बरेच जण जमा झाले होते. त्याचा व्हिडीओ त्यातील काही जणांनी शुट केला.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही बस सफाळे–कोरे होती. या बसला उशीर झाल्याने हा प्रकार घडला. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चालकाच्या या उद्दामपणाबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ड्युटीवर असतानाही या चालकाने आपला युनिफॉर्म उतरवला. एसटी आगाराचा जणू त्याने आखाडा केला. दंड थोपटले. शिवाय प्रवाशाला खाली उतरण्यास सांगितले. आपण कर्तव्यावर आहोत याचे ही भान त्यांना राहीले नाही.
अश्वजीत कांबळे या चालकाला रोखण्यासाठी त्याचे सहकारी ही पुढे सरसावले होते. पण ते त्यांचे ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. व्हिडीओमध्ये हे सर्व स्पष्ट दिसत आहे. एकाने रोखलं तर दुसरा त्यांना रोखत होता. पण त्यांना ही ढकलून कांबळे पुढे जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणती ही तक्रार दाखल झालेली नाही. किंवा कांबळे यांच्यावर ही कोणत्या कारवाईचे संकेत देण्यात आलेले नाहीत. मात्र या व्हिडीओची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.