जाहिरात

Shocking news: महिलेवर अत्याचार, मग गुप्तांगात खुपसली बाटली, डोकं दगडाने ठेचले, निर्भयापेक्षाही भयंकर कृत्य

नराधमांनी महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिची ओळख मिटवण्यासाठी दगडाने तिचा चेहरा आणि डोके पूर्णपणे ठेचून काढले.

Shocking news: महिलेवर अत्याचार, मग गुप्तांगात खुपसली बाटली, डोकं दगडाने ठेचले, निर्भयापेक्षाही भयंकर कृत्य
  • छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका मध्यमवयीन महिलेचा बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे
  • मृतदेह महामाया मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फुटपाथवर छिन्नविच्छिन्न अवस्थेत रक्ताने माखलेला सापडला होता
  • आरोपींनी महिलेचे दगडाने डोकं ठेचले, गळा दाबून हत्या केली आणि अमानवीय छळ केला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगडमधील अंबिकापूर जिल्ह्यात घडली आहे. एका मध्यमवयीन महिलेवर बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेतील क्रूरता पाहून दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये माणुसकीला लाजवेल असा हा प्रकार घडला आहे. एका महिलेसोबत झालेल्या अघोरी अत्याचार आणि हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. महामाया मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फुटपाथवर या महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला. या घटनेनंतर सर्वत्र भितीचे वातावरण आहे. 

3 एप्रिल रोजी सकाळी रिंग रोडवरील महामाया मंदिर प्रवेशद्वाराजवळ एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह नागरिकांना आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वाडसह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून दगडाने तिचे डोके ठेचले. इतकेच नव्हे, तर नराधमांनी पीडितेच्या गुप्तांगात बाटली घुसवून अमानवीय छळ केल्याचेही समोर आले आहे. हे पाहून अंगाचा थरकाप उडाला. पोलीस ही हादरून गेले. उपस्थितांच्या पायाखालची वाळू सरकली. 

नक्की वाचा - Nashik Accident: रात्रीच्या अंधारात अनर्थ.. एकाच घरातील 9 जणांचा अंत, कार विहिरीत कशी पडली?

या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट असून, आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी होत आहे. पोलीस अधीक्षक अमोलक सिंह यांनी सांगितले की, "सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके तैनात केली आहेत. स्थानिक नागरिकांनी या नृशंस घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळत असून, ही महिला या ठिकाणी कशी पोहोचली, याचा शोध घेतला जात आहे.

नक्की वाचा - VIDEO: बैलगाडा शर्यतीचा जीवघेणा थरार! 4 बाईक चिरडल्या, तरुणांना तुडवलं; कोल्हापुरातील भयंकर व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, नराधमांनी महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिची ओळख मिटवण्यासाठी दगडाने तिचा चेहरा आणि डोके पूर्णपणे ठेचून काढले. आरोपींच्या क्रौर्याची सीमा इथेच संपली नाही, तर त्यांनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पाण्याची बाटली टाकून तिचे प्रचंड हाल केले. रक्ताने माखलेला हा मृतदेह पाहून प्रत्यक्षदर्शींच्या पायाखालची जमीन सरकली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोलक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस आसपासच्या लोकांकडे विचारपूस करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com