Aurangzeb's Tomb : देशात पुन्हा कारसेवा होणार? औरंगजेबाच्या कबरीवरील बंदोबस्त वाढवला, विश्व हिंदू परिषद आक्रमक  

32 वर्षांपूर्वी घडलेल्या बाबरी विध्वंसाची पुनरावृत्ती होणार का? याची चर्चा आता देशात सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

32 वर्षांपूर्वी घडलेल्या बाबरी विध्वंसाची पुनरावृत्ती होणार का? याची चर्चा आता देशात सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे विश्व हिंदू परिषदेनं दिलेला इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर उखडून टाकण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिला आहे. विश्व हिंदू परिषद औरंगजेबची कबर काढण्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत. त्यानंतर 17 मार्चला राज्यातल्या तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. या आंदोलनानंतर काही दिवसांचं अल्टिमेटम सरकारला दिलं जाणार आहे. त्यानंतरही काही न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार, आंदोलनानंतरही काही न झाल्यास कारसेवा सुरू करत कबर उखडून टाकण्याचा विश्व हिंदू परिषदेने निर्णय घेतला आहे. अयोध्येमध्ये जसे कार सेवक गेले होते त्या प्रकारची भूमिका विश्व हिंदू परिषद या बाबत घेण्याचा इशारा देखील दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विश्व हिंदू परिषदेच्या या इशाऱ्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. काहींच्या मते औरंगजेबची कबर हटवणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्यासारखं आहे असं मत व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी अबू आझदमींनी औरंगजेबचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य केलं होतं. अबू आझमींनी औरंगजेब क्रूर नव्हता असं ते यावेळी म्हणाले होते. आणि याच विधानाचे देशभर पडसाद उमटले. यानंतर औरंगजेबची कबर उखडून ठेवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होऊ लागली. 

Advertisement

नक्की वाचा - Aurangzeb's Status : औरंगजेबाचं स्टेटस ठेवणं पडलं महागात; 14 जणांविरोधात कडक कारवाई

कुठे आहे औरंगजेबाची कबर?
औरंगजेबचा 1707 मध्ये अहिल्यानगर येथे मृत्यू झाला. त्यानंतरचा त्याचा मृतदेह खुलताबादला आणला. मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजींच्या शेजारीच असावी असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं, असं इतिहासकार सांगतात. त्यानुसार, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं खुलताबादमध्ये  कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. 

Advertisement

कबरीवरील सुरक्षा वाढवली...
छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याठिकाणी SRPFची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन अधिकारी आणि 15 कर्मचारीही बंदोबस्तात आहेत. या परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. 

Advertisement