जाहिरात

VVPAT मशीन काय असते ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT चा वापर नाही

Maharashtra Local Body Election: ऑक्टोबर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकियेला सुरुवात होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

VVPAT मशीन काय असते ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT चा वापर नाही
मुंबई:


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होऊ शकतात. मात्र त्या कधी होणार याचे उत्तर सर्वसामान्य मतदारांना अद्याप कळू शकलेले नाही. राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी म्हटले की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या आदेशामुळे काम थोडे सोपे झाले असून ओबीसींसाठी आरक्षित प्रभाग हे लॉटरी पद्धतीने निश्चित केले जाणार आहे. वाघमारे यांनी ऑक्टोबर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकियेला सुरुवात होईल अशी माहितीही दिली. यावेळी बोलताना वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नसल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कधीही व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आलेले नाही हे विशेष    

VVPAT मशीन काय असते ?

भारतीय EVM हे बॅटरीवर चालते. हे मशीन मतदानाचा रेकॉर्ड करतं. मतमोजणी करतं. या मशीनचे तीन भाग असतात. यामधील पहिला भाग कंट्रोल युनिट (सीयू), दुसरा भाग बॅलेटिंग युनिट (बीयू) हे दोन्ही मशीन पाच मीटर लांब एका तारेला जोडलेली असतात. तो तिसरा भाग असतो तो म्हणजे व्हीव्हीपॅट. बॅलेट युनिटवरील बटन दाबून मतदार मत नोंदवतो. दुसऱ्या युनिटमध्ये मत स्टोर केले जाते. एका बॅलेट युनिटमध्ये 16 उमेदवारांची नावे रेकॉर्ड केली जातात. जास्त उमेदवार असतील तर अतिरिक्ट बॅलेटिंग युनिट्सना कंट्रोल युनिटनं जोडता येतं. निवडणूक आयोगानुसार या प्रकारची 24 बॅलेटिंग युनिट एकत्र जोडता येतात. यामध्यमातून नोटासह 384 उमेदवारांसाठी मतदान केलं जातं. कंट्रोल युनिट बूथ मतदान अधिकाऱ्याकडं असतं. बॅलेट युनिट तीन बाजूनी बंदिस्त असतं. या वोटींग बूथमध्ये जाऊन मतदार आपले मत नोंदवतात. 

( नक्की वाचा: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार )

उमेदवारांची नावं कुठे रेकॉर्ड होतात?

बॅलेट युनिटवर पक्षाचे चिन्ह आणि उमेदवारांची नावं असतात. त्यावर उमेदवारांचा एक लहान फोटो देखील असतो. प्रत्येक उमेदवारासमोर एक निळं बटण असतं. ते बटण दाबून मतदान केलं जातं. मतदान केंद्रावर शेवटचं मत टाकल्यानंतर मतदान अधिकारी कंट्रोल युनिटवरील क्लोज बटन दाबतात. त्यानंतर इव्हीएममध्ये कोणतंही मत देता येत नाही.  मतदारांना त्यांनी नोंदवलेले मत योग्य उमेदवाराला मिळाले आहे की नाही हे व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPT) या मशीनच्या माध्यमातून पाहाता येते. व्हीव्हीपॅट मशीन हा खरंतर मतदार यंत्राचा भाग नसतो, ही वेगळी व्यवस्था असून तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिले आहे, ते मत त्यालाच गेले आहे की नाही याची खात्री होण्यासाठी आणि त्याची छापील प्रत जतन करून ठेवण्यासाठी ही व्यवस्था मदत करते. 

( नक्की वाचा: नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वेचा मुहूर्त ठरला )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com