Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार, विशेष मकोका कोर्टाचं निरीक्षण

संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. वाल्मीक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड

Walmik Karad News : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडचा मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदवले आहे. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. याच अर्जावर निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आहे. वाल्मीक कराडला का दोष मुक्त करण्यात येत नाही, या संदर्भात महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत.

यामध्ये वाल्मीक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे, असेही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले आहे. संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. वाल्मीक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मागच्या दहा वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत तर बीड जिल्हा न्यायालयात 11 प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट आहेत.

अवादा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणे, फोनवरुन धमकावणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्यात येत नाही. वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराड याचा जमीन फेटाळण्यात आल्याचेही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले आहे..

Topics mentioned in this article