Walmik Karad Sleep Apnea: वाल्मिक कराड 'या' आजाराने त्रस्त, रुग्णाचा होऊ शकतो मृत्यू?

ऑटोसीपॅप (Auto CPAP machine for Sleep Apnea) मशीन चुकीच्या पद्धतीने लावल्यास जीव जाऊ शकतो असा दावा वाल्मिक कराड (Walmik Karad Complaint) याने केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (Avaada Energy PVT. Ltd) या कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड (Walmik Karad arrested in extrotion case) याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याची सीआयडीच्या विशेष तपास पथकाकडून (CID SIT)  चौकशी सुरू आहे. या वाल्मिक कराडने केजच्या महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे (Kej Judicial Magistrate) एक विनंती अर्ज केला आहे. यामध्ये त्याने आपल्यासोबत एका सेवकालाही पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. आपल्याला स्लीप अ‍ॅप्नियाचा (Sleep Apnea) त्रास असल्याचे वाल्मिकचे म्हणणे आहे. रात्री झोपेत आपला जीव जाऊ नये यासाठी एक मशीन लावणे गरजेचे असते त्यासाठी आपल्याला सहाय्यकाची गरज असल्याचे वाल्मिकने म्हटले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्लीप अ‍ॅप्निया म्हणजे काय?  

स्लीप अ‍ॅप्निया (Sleep Apnea) हा एक प्रकारचा विकार असून त्यामुळे झोपेत श्वास घ्यायला त्रास होतो. झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास ऑक्सिजन पुरवठा खंडीत होतो, यामुळे रुग्ण झोपेतून अचानक उठतो किंवा झोपेतच तो गुदमरू शकतो.  

नक्की वाचा :वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, संतोष देशमुख हत्या-खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची मोठी कबुली

स्लीप अ‍ॅप्नियाचे प्रकार कोणते आहेत ?

ऑब्स्ट्रक्टिव स्लीप अ‍ॅप्निया (OSA): घशातील मांसपेशी सैल झाल्याने श्वास घेण्यास अडचण येते, याला ऑब्स्ट्रक्टिव स्लीप अ‍ॅप्निया असं म्हणतात.

सेंट्रल स्लीप अ‍ॅप्निया (CSA): यामध्ये मेंदूकडून श्वासोच्छवास नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना योग्य ते दिशानिर्देश मिळत नाहीत.  

मिक्स्ड स्लीप अ‍ॅप्निया:  यामध्ये रुग्णामध्ये OSA आणि CSA या दोन्हीची लक्षणे दिसून येतात. 

स्लीप अ‍ॅप्नियाची लक्षणे काय आहेत?
    •    जोरात घोरणे
    •    झोपेत श्वास थांबणे (इतरांच्या निदर्शनास येते)
    •    झोपेत घुसमटल्यासारखे होणे
    •    दिवसभर झोपेची गरज भासणे
    •    डोकेदुखी (सकाळी)
    •    लक्ष केंद्रित करण्यात अडचण
    •    चिडचिडेपणा किंवा तणाव.

स्लीप अ‍ॅप्निया बळावण्याची कारणे कोणती आहेत ?
    •    लठ्ठपणा
    •    वय वाढणे
    •    घशाच्या रचनेतील बदल
    •    धूम्रपान आणि मद्यपान
    •    आनुवंशिकता

Advertisement

शांत झोपेसाठी मशीनसह सहाय्यकाची मागणी

गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याला रात्रीची शांत झोप हवी आहे. स्लीप अ‍ॅप्नियाचा त्रास होऊ नये, शांत झोप लागावी, झोपेत आपला जीव जाऊ नये यासाठी त्याने केजच्या न्याय दंडाधिकाऱ्यांकडे ऑटोसीपॅप मशीन आणि ती चालवण्यासाठी सहाय्यकाची मागणी केली आहे. या मशीनमुळे झोपेत श्वासोच्छवास सुरळित राहतो, ऑक्सिजनचा पुरवठा नियमित असतो.

स्लीप अ‍ॅप्नियामुळे बप्पी लाहिरींचा मृत्यू 

गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा फेब्रुवारी 2022 मध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला स्लीप अ‍ॅप्नियाच कारणीभूत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. गळ्याच्या मांसपेशी झोपेमध्ये सैल पडतात ज्यामुळे वायूमार्ग बंद होतो आणि बाधित व्यक्ती घोरायला लागतो. श्वास घेण्यास अडचण आल्याने ऑक्सिजनची पातळी कमी व्हायला लागते आणि रुग्णाचा मृत्यू होतो. बप्पी लाहिरी यांच्याबाबतही असेच झाले होते. 

Advertisement