22 hours ago

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत 288 विरुद्ध 232 मतांनी मंजूर झालं. या विधेयकाला काँग्रेसह इंडिया आघाडीने विरोध केला. शेवटी हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलं. आज हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे.  

Apr 03, 2025 22:04 (IST)

सतीश भोसले उर्फ खोक्या याला मारहाण

सतीश भोसले उर्फ खोक्या याला मारहाण झाली आहे.  वन विभागाच्या कोठडीत त्याला मारहाण झाल्याचा दावा त्याच्या वकीलांनी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Apr 03, 2025 21:00 (IST)

माझ्या विरोधात बीड सारखा कट घडवण्याचा प्लॅन होता- जयकुमार गोरे

 माझ्या बाबतीतही बीड सारखा कट घडवण्याचा प्लॅन होता. पण मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो. अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कटात अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. यामध्ये कुणालातरी संपवून माझ्यावर खापर फोडण्याचे षडयंत्र शिजले गेले असल्याचा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. 

Apr 03, 2025 19:28 (IST)

अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर ? साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा गंभीर आरोप

 उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सत्तेचा गैर  वापर सुरू असून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.

Apr 03, 2025 17:14 (IST)

प्रशांत कोरटकरचा जमीन अर्ज दाखल

प्रशांत कोरटकरचा जमीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.  जामीनासाठी त्याने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.  कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कोरटकर सध्या न्यायालयीन कोठाडीत आहे. 

Advertisement
Apr 03, 2025 17:13 (IST)

अनधिकृत बांधकामावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला

अनधिकृत  बांधकामावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला  करण्यात आला आहे.  रिव्हॉल्वरचा धाक दाखवत अधिकारी कर्मचाऱ्यांना  मारहाण करण्यात आली. शिवाय गाड्यांची तोडफोड करण्यात आली.  शिवसेना  शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील त्याचा मुलगा वैभव पाटील आणि त्याच्या साथीदारांचा प्रताप असल्याचं बोललं जात आहे.  याआधी केडीएमसीत तीन कर्मचाऱ्यांना बांधून मारहाण करण्यात आली होती. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Apr 03, 2025 15:36 (IST)

सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.  आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी हे भूकंपाचे सौम्य धक्के बसले.  2.6  रिश्टर स्केलचे हे धक्के होते. NCS ने ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर भूकंपाचे क्षेत्र आहे.  सांगोला तालुक्यात भूकंपाचे क्षेत्र असल्याचा अंदाज आहे. 

Advertisement
Apr 03, 2025 15:16 (IST)

Live Update : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफसंदर्भातील घोषणेमुळे सोन्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफसंदर्भातील घोषणेमुळे सोन्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता 

टॅरिफ संदर्भातील घोषणेपूर्वीच सोन्याच्या वाढलेले भाव व पुढील काळात सोन्याच्या भावावर होणारा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात मंदीचं सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अन्य देशांवर लावलेल्या टॅरिफमुळे पुढील काळात सोन्याचे दर एक लाखांवर पोहोचण्याचा सोने तज्ज्ञांचा अंदाज आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर सद्यस्थितीत जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याच्या गुंतवणुकीत वेट अँड वॉच ची भूमिका आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Apr 03, 2025 15:13 (IST)

Live Update : शिकारीचं साहित्य घरात आढळल्याप्रकरणी सतीश भोसलेला वन विभागाने घेतलं ताब्यात

शिरूर न्यायालयात यासंदर्भात अर्ज करण्यात आला होता. वन विभागाकडून सतीश भोसलेची चौकशी होणार आहे. वनविभागाच्या जागेत सतीश भोसलेने अनाधिकृत बांधकाम केलं होतं. सतीश भोसले याला वनविभाग शिरूरच्या न्यायालयात हजर करणार आहे. 

Advertisement
Apr 03, 2025 15:11 (IST)

Live Update : डेकोरेशनचं साहित्य चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

डेकोरेशनच गोडाऊन फोडून डेकोरेशनचे साहित्य चोरी करणाऱ्या आरोपीला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमध्ये नागपूरातील झिंगाबाई टाकळी या भागातील फिर्यादी नितीन मिश्रा यांच्या डेकोरेशन गोडाऊनमधून डेकोरेशन साहित्य चोरी झाल्याची तक्रार आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.  यात आरोपी गौरव पांडे याने साहित्य चोरी करून गाडीत भरून नेल्याचं पोलिसांना लक्षात आल्यानंतर पोलिसांनी गाडीचा शोध घेत आरोपी गौरव पांडे याला पडकलं.  

Apr 03, 2025 13:44 (IST)

Live Update : विदर्भात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

सध्या नागपूरसह विदर्भात कित्येक ठिकाणी विजेचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे.

पुढील तीन तास म्हणजे आज सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात अधिकांश ठिकाणी आणि अन्य जिल्ह्यांत काही ठिकाणी तसेच पश्चिम विदर्भात सर्व जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सध्या पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, या चार जिल्ह्यांत आणि पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांत म्हणजेच अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांत कित्येक ठिकाणी पाऊस कोसळत आहे.

Apr 03, 2025 11:57 (IST)

Live Update : उल्हासनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बत्ती गुल

उल्हासनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बत्ती गुल

बँकेत अचानक लाईट गेल्यामुळे ग्राहक ताटकळले

महावितरणकडून लाईट गेल्याचं बँकेचं स्पष्टीकरण

जनरेटरवर बँकेचा वीजपुरवठा सुरू

Apr 03, 2025 11:54 (IST)

Live Update : आज दुपारी 1 वाजता वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर करणार

आज दुपारी 1 वाजता वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर करणार

Apr 03, 2025 11:52 (IST)

Live Update : आज सकाळी 11 वाजता मनसेचा वांद्रेतील एसआरए कार्यालयावर मोर्चा

आज सकाळी 11 वाजता मनसेचा एसआरए कार्यालय वांद्रे इथे मोर्चा 

मनसेचे नेते आणि मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा 

मुंबईतील एसआरएच्या विविध प्रश्ना संदर्भात मोर्चा 

वरळीमधील सिद्धार्थ नगर, प्रेम नगर इथल्या वर्षानुवर्ष  रखडलेल्या एस आर ए प्रकल्प रखडलेत, इथले नागरिक ही मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार

Apr 03, 2025 11:19 (IST)

Live Update : वक्फ विधेयकासाठी आम्हाला थोडा वेळ हवा आहे. - साकेत गोखले

बुधवारी रात्री उशीरा 2 वाजता लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे इतक्या कमी वेळेत राज्यसभेतील सदस्यांना वक्फ विधेयक वाचणं आणि सुधारणा सुचवणं कसं शक्य होईल? आम्हाला थोडा वेळ हवा आहे.  

साकेत गोखले, AITC, पश्चिम बंगाल

Apr 03, 2025 11:16 (IST)

Live Update : राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकाबाबत चर्चेला सुरुवात...

राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकाबाबत चर्चेला सुरुवात...

Apr 03, 2025 10:39 (IST)

Live Update : खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षाची भूमिका न मांडता केलं मतदान

अजित पवार पक्षांने लोकसभेत भूमिका जाहीर केली नाही.

वक्फ बोर्ड सुधारणा कायद्यासंदर्भात पक्षाच्या वतीने कोणीही भूमिका मांडली नाही

खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षाची भूमिका न मांडता केलं मतदान 

वक्फ सुधारणा विधेयकावर राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका गुलदस्त्यात

सर्वच पक्षाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी असताना अजित पवार यांच्या पक्षाने कोणतीही भूमिका का मांडली नाही, यावरून सवाल उपस्थित केला जातोय.

Apr 03, 2025 10:24 (IST)

Live Update : उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद

उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद

Apr 03, 2025 08:59 (IST)

Live Update : पुणे शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा आज बंद राहणार

पुणे शहरातला पाणीपुरवठा आज बंद राहणार

पुण्यातील अनेक भागातील पाणीपुरवठा आज राहणार बंद 

देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी केला जाणार आजचा संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद 

उद्या उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता

पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे

पर्वती जलकेंद्र 

वडगाव जलकेंद्र

 भामा आसखेड जलकेंद्र 

गांधी भवन टाकी परिसर 

पॅन कार्ड क्लब टाकी परिसर 

एनडीटी पाणीपुरवठा केंद्र 

चतुर्श्रुंगी

लष्कर 

वारजे 

पाषाण 

या सर्व परिसरातील पाणीपुरवठा असणार आज पूर्णतः बंद

Apr 03, 2025 08:13 (IST)

Live Update : मृतकाचे व्हॉट्सअप स्टेटस पुराव्यावरून तलाठीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी-मेहुण्यावर गुन्हा..

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील तलाठी शिलानंद तेलगोटे (39) यांनी रविवारी दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तपासादरम्यान पोलिसांना व्हॉट्सअॅप स्टेटस सुसाईड नोट सापडली, ज्यात त्यांनी पत्नी प्रतिभा तेलगोटे व तिचा भाऊ प्रवीण गायगोले यांच्यावर मानसिक त्रास व आर्थिक फसवणुकीचे आरोप केले. या आधारे तेल्हारा पोलिसांनी 1 एप्रिलला रात्री दोघांविरुद्ध आत्महत्या सहाय्य आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मृतकाचे व्हॉट्सअॅप स्टेटस व पुरावे जप्त केले असून, प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करीत आहेत

Apr 03, 2025 07:16 (IST)

Live Update : पुण्यातील ससून रुग्णालयात ACB कडून छापेमारी

पुण्यातील ससून रुग्णालयात ACB कडून छापेमारी 

ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना ACB ने घेतलं ताब्यात 

दोन्ही अधिकारी १ लाख रुपयांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात 

ससून रुग्णालयात झालेल्या एका कामाची बिल काढताना कॉन्ट्रॅक्टरकडून लाच घेतली असल्याची प्राथमिक माहिती 

ससून कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांच्यासह वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना ACB ने घेतलं ताब्यात

Apr 03, 2025 07:14 (IST)

Live Update : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून आधुनिक थ्रीडी तंत्रज्ञान वापरून त्याची अधिक चौकशी करणार होते. परंतु, यामध्ये त्याची चालण्याची स्टाईल तसेच त्याच्या छोट्या छोट्या लकबी यामाध्यमातून तपासून पुराव्यांमध्ये त्याचा अंतर्भाव केला जाणार होता. मात्र, न्यायालयातून गाडेच्या ताब्यालाच परवानगी न मिळाल्याने या कार्यवाहीला काहीकाळ खंड पडला आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडता यावी व गुन्ह्यातील तपासातील काही बाबींवर विचारपूस करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी पोलिसांना हवी होती. त्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता

Apr 03, 2025 07:12 (IST)

Live Update : अमळनेर शहराजवळील अंबर्शी टेकडीला भीषण आग

ळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी टेकडीवर भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने चार तासांच्या प्रयत्नानंतर टेकडीवर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या घटनेत टेकडीवरील हजारो झाडे जळाली असून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीकडून ही आग लावल्या गेल्याचा संशय व्यक्त केला जात असून प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

Apr 03, 2025 07:11 (IST)

Live Update : कंपनीच्याच वाहनचालकाने 8 लाख 35 हजारांचा पापड मसाला केला लंपास

जळगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीतून 8 लाख 35 हजारांचा पापड मसाला अज्ञाताने लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या चोरीच्या घटनेचा तपास करत कंपनीतच काम करणाऱ्या वाहन चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणली असून चोरी करणारा वाहन चालक अनिल पाटील यांच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल व एक व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे.