Wardha Accident : रान डुक्कर आडवं आल्याने अपघात, अख्ख कुटुंब संपलं; पती-पत्नीसह दोन मुलांचा मृत्यू

Wardha Accident : पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबियांसह वर्ध्याकडे येत असताना हा अपघात झाला. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ प्रशांत यांची कार अनियंत्रित झाली.

जाहिरात
Read Time: 1 min

प्रशांत बंगाळे, वर्धा

कार आणि टँकरमध्ये झालेल्या धडकेत अख्खं कुटुंब संपलं आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासह रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता कुटुंबासोबत गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना हा अपघात झाला.

(नक्की वाचा- वेळेत रुग्णवाहिका पोहोचली नाही, आमदार निवासात कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू)

प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबियांसह वर्ध्याकडे येत असताना हा अपघात झाला. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ प्रशांत यांची कार अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला कार जाऊन धडकली. 

(नक्की वाचा- वेळेत रुग्णवाहिका पोहोचली नाही, आमदार निवासात कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू)

या अपघातात प्रशांत वैद्य त्यांची पत्नी प्रियंका यांचा आणि मुलाचा (3 वर्ष) जागीच मृत्यू झाला.. तर  मुलीचा (5 वर्ष) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात हसतं-खेळतं कुटुंब संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article