निलेश बंगाले, वर्धा:
Wardha News: वर्धा पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान हे राज्य व या मार्गातील एकुण ३० टोल नाके व वेगवेगळया ठिकाणचे 300 सिसिटीव्ही फुटेज चेक करून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनीचोरी गेलेला 10 चाकी ट्रक 8 दिवसांत शोधून परत आणला.
वर्धा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्धा पोलिसांनी चोरी गेलेला 10 चाकी ट्रक 8 दिवसांत शोधून परत आणला आहे. कोणतेही पुरावे नसताना तांत्रीक माहितीच्या आधारे वर्धा पोलिसांनी गुन्ह्यातील लावलेल्या छड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी ट्रक चालक, क्लिनर याचे रूपात वेशांतर करून बाहेर राज्यात चोरी गेलेला ट्रक मध्यप्रदेश राज्यातील अतिदृग्ग्रम भाग असलेल्या अलीयापुर जिल्ह्यातील ग्राम बोरकरा येथून शोधून आणला.
Palghar News: विरार ते वलसाड मार्गावरील प्रवाशांना दिलासा! 'ही' विशेष रेल्वे आता दररोज धावणार
यासाठी वर्ध्यात पोलिसांनी चार राज्यात जाऊन 30 टोलनाक्यावरील जवळपास 300 सीसीटीव्ही कॅमेराचा तपास करत चोरीस गेलेला ट्रक मध्यप्रदेशमधील अतिदुर्गम भागातून शोधून आणला आहे. यासाठी पोलिसांनी ट्रक चालक, किल्नरचे वेशांतर केले. वर्धा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे कोणतेही पुरावे नसताना तांत्रिक माहितीच्या आधारे वर्धा पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावला.
अवैध दारु वाहतुकीवर आळा...
दुसरीकडे, वर्ध्याच्या पुलगाव उपविभागीय पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कानगाव-मोझरी मार्गावर 1 लाख 42 हजरांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच टिळक नगर,पुलगाव येथे आणखी 39 हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दारूबंदी कायद्यान्वये अल्लीपूर व पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Pune News: चुकलं की हुकलं! सोडतीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये महापौरपदासाठी ट्वीस्ट, मोठी रस्सीखेच