वडील मोबाइल रीचार्ज करण्यासाठी गेले, पण घरी आला त्यांचा मृतदेह 

वर्ध्यामध्ये नदी पात्रालगत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

वर्ध्यामध्ये नदी पात्रालगत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (27 मे 2024) रात्री धारदार शस्त्राने वार करून एका व्यक्तीची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. बाबाराव महादेव पारिसे (वय 55 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाबाराव पारिसे हे तळेगाव शामजी पंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नमस्कारी येथील रहिवासी होते. सोमवारी नमस्कारी गावालगत असलेल्या भारसवाडा येथे आठवडी बाजार भरतो. याच बाजारामध्ये पारिसे यांचा मुलगा देखील खरेदीसाठी गेला होता. 

(नक्की वाचा: मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार, तणावामुळे परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात)

पारिसे यांचा मुलगा बाजारातून घरी गेल्यानंतर वडील दिसले नाहीत म्हणून त्यानं आईकडे चौकशी केली. त्यावर बाबा मोबाइल रीचार्ज करण्यासाठी गेल्याचे आईने सांगितले. पण बराच वेळ उलटूनही बाबाराव पारिसे घरी न आल्याने पत्नी व मुलाने त्यांचा आसपासच्या परिसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईकासह पायवाटेने जात असताना पारिसे यांच्या मुलाला वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. वडिलांना अशा अवस्थेत पाहून मुलाची पायाखालची जमीनच सरकली.

(नक्की वाचा: साखरझोपेतच काळाचा घाला! झोपडीत बस घुसल्याने 4 मजुरांचा जागीच मृत्यू)

यावेळेस त्यांच्या कपाळ, गाल आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. या दोघांनी तात्काळ तळेगाव पोलीस गाठले. यानंतर तळेगाव पोलीस ठाण्याचे संदीप धोबे आणि पथकाने घटनास्थळ दाखल झाले व  त्यांना मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बाबाराव महादेव पारिसे यांची हत्या कोणी का? कोणत्या कारणामुळे केली? याचा तपास पोलीस करताहेत. 

(नक्की वाचा: Porsche Accident Pune Case: आरोपीच्या आजोबांना अटक, ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप)

पुण्याची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरात? पाहा काळजाचा ठोका चुकवणारी बातमी

Topics mentioned in this article