Wardha News: देवीला नैवेद्य नेताना विपरित घडलं, आई वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा दुर्दैवी अंत, हृदयद्रावक घटना

जाहिरात
Read Time: 2 mins

निलेश बंगाले,वर्धा: साडेतीन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई-वडिलांसमोरच चिमुकलीने प्राण सोडले. वर्ध्याच्या आर्वीमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या नवमी निमित्ताने देवीला नैवेद्य चढवत असतानाच ही घटना घडली.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आर्वीतील मरामाय माता मंदिरात देवीला नैवद्य घेऊन गेलेल्या महिलेच्या साडेतीन वर्षीय मुलीच्या अंगावर झाड कोसळले. यात मुलीचा तिचा जागीच मृत्यू झाला.  रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील वाल्मीक वॉर्ड येथे ही घटना घडली आहे. 

पूर्वा शरद दंडारे असं मृत चिमुकलीचे नाव आहे. शरद दंडारे, त्यांची पत्नी व चिमुकली हे तिघेही पुलगाव मार्गावरील शोभा काळे यांच्या शेतातील मरीमाय माता मंदिरात नवरात्री नवमीनिमित्ताने नैवेद्य दाखवण्यासाठी गेले होते. 

(नक्की वाचा-  Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)

आई-बाबा मंदिरात पूजा करत असतानाच बाहेर सोसाट्याचा वारा सुटला. दरम्यान बाहेर खेळत असलेल्या चिमुकलीच्या अंगावर अचानक महारुकाचे झाड पडला. भल्यामोठ्या झाडाखाली पूर्वा दबली गेली. कसंबसं आई-वडिलांनी तिला झाडाखालून काढलं आणि आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Advertisement

(नक्की वाचा - Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!)