SSC Result : 'वय हा फक्त आकडा', वयाच्या 68 व्या वर्षी दहावीचा अभ्यास, आजीने नातवासोबत मिळवलं मोठं यश

'वय हा फक्त आकडा आहे' अशी एक म्हण आहे. जिथं इच्छाशक्ती असते तिथं वय तुम्हाला कधीच अडवू शकत नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

निलेश बंगाले, प्रतिनिधी

वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षाच्या आजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आजीचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे आजीसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या इंदूताई यांना 51 टक्के गुण मिळाले आहेत, तर नातू धीरज याला 75 टक्के गुण मिळाले आहे. एकाच वेळी आजी आणि नातू परीक्षेला बसले आणि पासही झाले. जामनी या गावात इंदूताई ह्या बचत गटाच्या कामात सतत पुढाकार घेतात. वयाच्या या टप्प्यातही त्यांना नव्या नव्या गोष्टी शिकण्याची आवड आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केवळ सातवीपर्यत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदूताई परमेश्वर बोरकर यांना पुढे शिकता आलं नाही. पण वयाच्या 68 व्या वर्षी इंदूताईना प्रथम संस्थेकडून पुन्हा संधी मिळाली आणि त्यांनी दहावीची परीक्षा देत यश मिळविले आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा

इंदूताईनी माहेरी सातवीपर्यत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळी लग्न झालं. शिकण्याची इच्छा असतानाही पुढे शिकता आले नाही. परंतु प्रथम या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना दुसरी संधी देत दहावीच्या परीक्षेची तयारी करून घेतली. त्यांना परीक्षेला बसविलं. त्यात इंदूताई यांनी देखील वर्षभर दहावीचे धडे गिरवत परीक्षा दिली. इंदूताई सोबत परीक्षा द्यायला केंद्रावर नातू देखील होता. आजी आणि नातवाची दहावीची परीक्षा एकाच वेळी झाल्याने हे दोघेही चर्चेचा विषय ठरले. म्हातारीला या वयात परीक्षा सुचली, म्हणत टीकाही व्हायला लागली. पण आता याच म्हातारीने परीक्षेत यश मिळवून बोलणाऱ्यांची तोंड बंद केली आहे. 

Advertisement